काशिफ़ अंसारी
प्रतिनिधी, पालघर
पालघर – पालघर चे भाजप जिल्हाध्यक्ष भरत राजपूत , भाऊ जगदीश राजपूत यांच्यासह आणखी दोघांवर ॲट्रॉसिटी सह विविध कलमांअंतर्गत डहाणू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . एका आदिवासी समाजातील इसमाला आपल्या कार्यालयात बोलून मारहाण आणि शिवीगाळ करत जीवेत मारण्याची धमकी दिल्या प्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . एका स्थानिक संघटनेच्या पदाधिकाऱ्याला घरी बोलवल्याच्या रागातून राजपूत यांनीही मारहाण केल्याची फिर्याद प्रकाश ठाकरे यांनी दिल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या प्रकरणात जिल्हाध्यक्ष भरत रजपूत , भाऊ जगदीश राजपूत यांच्यासह आणखी दोघांवर भा.द. वि . कलम 323, 504, 506(2), 34 , 3(1),(r) 3(1)(s) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून डहाणू पोलीस कार्यवाही करत आहेत .