सिध्दोधन घाटे
जिल्हा प्रतिनिधी बीड
परळी वै. : दि. ०९ ऑगस्ट २०२३ परळी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस सेवा चालू करावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील नागरिकांतून होत आहे.गेल्या काही दिवसांपासून परळी वैजनाथ शहरातील उपजिल्हा रुग्णालयातील वेगवेगळ्या विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या अचानकपणे केल्याने रूग्णालयात येणाऱ्या रूग्णांची हेळसांड होताना दिसत आहे. परळी वैजनाथ शहरातील आणि ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात या रूग्णालयात उपचार घेण्यासाठी येतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून एक्स रे विभाग बंद असल्याने रूग्णांची गैरसोय होत आहे. गोरगरीब लोकांना खाजगी रूग्णालयात जाऊन जास्तीचे पैसे खर्च करून एक्स रे काढणे भाग पडत आहे. त्याचबरोबर शहरातील तालुक्यातील गोरगरीब जनतेला डायलिसिस करण्यासाठी लातूर या ठिकाणी जावे लागत आहे. गेल्या अनेक वर्षापासून नागरीक डायलिसिसची सोय नसल्यामुळे जिल्ह्याबाहेर जाऊन डायलिसिस करत आहेत.तेव्हा परळी वैजनाथ उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांनी परळी शहरातील आणि ग्रामीण भागातील होत असलेली रूग्णांची गैरसोय थांबवावी अशी मागणी जनतेतून येत आहे.