सुरेश नारायणे
तालुका प्रतिनिधी नांदगाव
नांदगाव बस स्थानकाजवळ सोमवारी दि. ७ अॉगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास नांदगाव तालुक्यातील माणिकपुंज( ठाकरवाडी ) या ग्रामीण भागातील आदिवासी समाजातील शालेय शिक्षण घेणारे विद्यार्थी मुले – मुली हे घरी जाण्यासाठी एस.टी.बस मध्ये बसण्यासाठी गेले. तेथील एसटी महामंडळाच्या वाहतूक निरीक्षक अधिकारी विनोद इपर यांनी विद्यार्थ्यांना बसमध्ये बसण्यास मजाव करून विरोध केला.त्यावरून शालेय विद्यार्थ्यांनी जाब विचारला असता , त्याचा राग येऊन अधिवासी विद्यार्थ्यांना जातीवाचक अशोभनीय शिवीगाळ करून विद्यार्थ्यांना दमदाटी,शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना नाशिक जिल्ह्यातील नांदगाव शहरात घडली.सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होताच आदिवासी समाज संघटना कार्यकर्त्यांनी बस स्थानकात धाव घेतली . सहायक वाहतूक निरीक्षक असलेल्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करावी अशी मागणी यावेळी केली. यावेळी मोठा जमाव बसस्थानकात जमा झाला. पोलिसांनी या प्रकरणी मध्यस्थी करत घटनेचा व्हिडिओ तपासून संबंधितांवर गुन्हा रजिस्टर नंबर ३३३ भांदवी कलम २९४, ३२३,५०४,५०६,गुन्हा दाखल करून पुढील कारवाई केली आहे. गुन्हा दाखल झाल्या नंतर अधिवासी बांधवांचा जमाव माघारी फिरला. नांदगाव ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली राजु मोरे पुढील तपास करीत आहे.










