वैभव गुजरकर
ग्रामीण प्रतिनिधी अकोट
अकोट :- तालुक्यातील ग्राम सावरा येथे केंद्रीय मानव अधिकार सुरक्षा संघटन दिल्ली यांच्यावतीने पदग्रहण सोहळाव विद्यार्थ्यांचा सत्कार तेज किरण चव्हाण राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मा अ सु . स .दिल्ली यांच्या मार्गदर्शनात सावरा येथील संत गाडगे महाराज सभागृह मध्ये केंद्रीय मानव अधिकार सुरक्षा संगठन व जनजागृती करिता स्थानिक पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण व प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा करण्यात आला समाजसेवक विठ्ठलराव गुजरकर यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख अतिथी रवींद्र खेडकर महाराष्ट्र राज्य सचिव व सौ प्रियंका चव्हाण महाराष्ट्र राज्य प्रभारी गजानन तांदूळकर अध्यक्ष नागपूर, सुरेंद्र निरटकर उपाध्यक्ष, राजू नानोटकर ग्रामीण अध्यक्ष, वासुदेव गायधने नागपूर शहर अध्यक्ष ,मनोहर खेडकर अम अध्यक्ष ,प्रशांत जोशी हिंगणा तालुका अध्यक्ष, संजय भोयर अम सचिव, सुधीर जीतकर व सरपंच पती योगेश मोरे ,सेवानिवृत्त शिक्षक मदन खैरे ,दिगंबर सपकाळ ,प्रकाश साबळे, रजनी यदुवंशी , यांच्या हस्ते भारतमाता प्रतिमेचे पूजन करून मान्यवराचे स्वागत व शाल ,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्रियंका मॅडम यांनी करून मान्यवर पाहुण्यांनी मार्गदर्शनपर केंद्रीय मानव अधिकार बाबत सखोल मार्गदर्शन केले नंतर प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर सामाजिक , राजकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्याचा सत्कार करण्यात आला. विशेषता महिला विश्वात कार्य करणाऱ्या महिलांचा सुद्धा गुणगौरव करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक देवेंद्र पुनकर जिल्हाध्यक्ष अकोला, व नरेश पुनकर कास्ट शिल्पकार यांनी आयोजित केले असून संचालन शिवाजी टोलमारे, व प्रियंका चव्हाण यांनी केले .कार्यक्रमाला पदग्रहण करिता देवेंद्र पुनकर अध्यक्ष ,अनिल गुप्ता उपाध्यक्ष , नितीन टोलमारे तालुका अध्यक्ष,गोपाल पळसकर सचिव, निलेश अडोकार कोषाध्यक्ष, शुभम पुनकर सदस्य, वर्षा पुणकर , महीलाजिल्हाध्यक्ष, उपाध्यक्ष मुक्ता पुनकर, संगिता गुप्ता सदस्य मेघा पुनकर महीला महासचीव, राजश्री वानरे महीला सचीव,जया भोलनकर, वच्छला पुनकर, रुपाली अडोकार,कल्पना आकोटकर,
उपस्थित कार्यक्रमांमध्ये प्रशांत गुजरकर, संतोष पुनकर ,मोहन काळे, गणेश पुनकर,सचिन दातकर , प्रफुल गुप्ता,शंकर दातकर ,सुनील काळे, योगेश पुणकर आदीची उपस्थिती लाभली व आभार प्रदर्शन संगीता पुनकर यांनी केले होते











