सुरेश नारायणे
तालुका प्रतिनिधी, नांदगाव
नांदगाव तालुक्यातील टाकळी येथे कोब्राने चक्क कोब्रा सापाला गिळला आहे . टाकळी येथील सागर पवार पहाटे विहिरी जवळ मोटर चालू करायला गेले. त्या वेळेस त्यांना विहिरीत एक मोठा साप पाण्यात पडलेला दिसला . सागर यांनी सर्पमित्र विजय बडोदे यांना संपर्क केला . बडोदे यांनी विहिरीत बघितलं तर साडे पाच फूट लांबीचा कोब्रा जातीचा विषारी साप पडलेला होता . त्याला बाहेर काढलं आणि पकडत असताना कोब्रा सापाने आपल्याच प्रजातीचा कोब्रा सापाला पोटातून बाहेर काढलं हा प्रकार बघितल्या वर बरेच लोकांनी गर्दी केली. बडोदे यांनी माहिती दिली असता कोब्रा सापाला भक्ष बनवतो . आपण ऐकलं पण आपल्याच प्रजीचा साप भक्ष बनवताना बघायला मिळत नाही . हा दृश्य दुर्मिळच आहे ,आता पावसाचे दिवस आहे. पाणी बिळात शिरतात आणि साप बाहेर निघतात आपलं परिसर स्वछ ठेव्हा पाळा पाचोळा साफ करा साप कुठे पण आसरा घेतो साप दिसल्यावर मारू नका , सर्पमित्रना संपर्क करा अशी माहिती सर्पमित्र विजय बडोदे यांनी दिली आणि वनविभाग नोंद करून निसर्गमुक्त करण्यात आले.









