रमेश शिंगोटे तालुका प्रतिनिधी, संगमनेर
संगमनेर : तालुक्यातील कोकणगाव कोल्हार घोटी रस्त्याच्या महामार्गावर असून संगमनेर पासून गावचे अंतर जवळ जवळ बारा किलोमीटरचे आहे व तसेच लोणी हे कोकणगाव पासून पूर्वेला सोळा किलोमीटर अंतरावर आहे, विद्यालय शिक्षण झाल्यानंतर महाविद्यालयात प्रवेश घेतल्यावर शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी जात असतात त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून… शालेय विद्यार्थ्यांसह पंचक्रोशीतील शिवापूर, कोकणगाव, मनोली, मेंढवान , कोचीं,यांची, लोहारे, कासारे , रहिमपूर तसेच वाड्या वस्त्या त्यावरील प्रवासी ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी लोणी नगर कोल्हार संगमनेर या शहरांकडे जाण्या येण्यासाठी एसटी महामंडळाचा बस थांबा , बस थांबने अत्यंत गरजेचे आहे .. अनेक दिवसापासून या ठिकाणी अधिकृत बस थांबा नसल्यामुळे सर्व प्रवाशांना खाजगी वाहतुकीने प्रवास करावा लागतो, अशी परिस्थिती अनेक वर्षापासून आहे कोल्हार घोटी हावेवर गाव असतानाही जाणाऱ्या महाविद्यालयातील विद्यार्थीस एस टी महामंडळाच्या बसचा उपयोग होत नाही, त्यामुळे ग्रामस्थांनी अनेक वेळा या ठिकाणी अधिकृत बस थांबा व्हावा अशी मागणी केलेली आहे परंतु या मागणीला अद्याप पर्यंत यश आले नाही, असलेली समस्या शैक्षणिक मुलांच्या दृष्टीने अतिशय त्रासदायक असून मुलांना शिक्षणासाठी जाण्यासाठी अतिशय संघर्ष करावा लागतो परिणामी येण्याचा आर्थिक भार वाढत असल्याने अनेक विद्यार्थी शालेय शिक्षणाचा मार्ग बंद करतात किंवा केला आहे अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांसह इतर प्रवाशांची सोय व्हावी यासाठी कोकणगाव चौकात अधिकृत एसटी बस थांबा व्हावा या मागणीचे निवेदन संघर्ष सामाजिक संघटनेच्या वतीने एस टी महामंडळाचे संगमनेरचे आगाराचे प्रमुख प्रशांत गुंड यांना देण्यात आले.. यावेळी निवेदन देण्यासाठी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संग्राम जोंधळे, सचिव अशोक पवार , पूर्व विभाग प्रमुख भाऊसाहेब पवार, कोकणगाव शाखेचे अध्यक्ष लक्ष्मण पवार तसेच संघर्ष सामाजिक संघटनेचे तालुका अध्यक्ष भारत पडवळ यांनी निवेदन दिले.









