प्रकाश नाईक,
तालुका प्रतिनिधी अक्कलकुवा
अक्कलकुवा : अक्कलकुवा तालुक्यातील ब्रिटिश अंकुश विहीर येथील अश्वत्थामा माध्यमिक विद्यालयात पाचवी व सहावी च्या विद्यार्थ्यांना दप्तर व शैक्षणिक साहित्याचे वाटप सिंदगव्हाण येथील जोगेश्वरी माता सेवाभावी संस्थेच्या मार्फत करण्यात आले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष तथा भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश निमंत्रित सदस्य नागेश पाडवी,संस्थेचे सचिव प्रभाकर उगले, अश्वत्थामा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ जसपाल वळवी, पर्यवेक्षक धनराज मराठे, जोगेश्वरी माता सेवाभावी संस्थेचे दिपक पाटील, प्रमोद राजपूत,देसले सर आदी प्रमुख अतिथी उपस्थित होते.
शैक्षणिक साहित्याचे वाटप केल्यामूळे विद्यार्थ्यांच्या चेह-यावर हसू फुलले होते.बरेच विद्यार्थी गरीब असल्याने शैक्षणिक साहित्यापासून वंचित राहत असतात.अशा विद्यार्थ्यांना विविध अश्या संस्थांमार्फत राबविण्यात येणारे उपक्रम आदर्श ठरत असतात.
यावेळी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.