अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
अकोला : संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हा परिषद मध्ये ” जिल्हा परिषद सरळ सेवा मेगा भरती -2023″ या नावाने जाहिरात देऊन विद्यार्थी/विद्यार्थिनी कडून महाराष्ट्र सरकार बेरोजगार असलेल्या विद्यार्थ्यांकडून एस सी/ एसटी करिता 900 तर ओपन करिता 1000 रुपये प्रायव्हेट कंपनी मार्फत परीक्षा शुल्क वसूल करत असून अक्षरशः बेरोजगार युवकांची लूट सुरू आहे तात्काळ बेरोजगार युवकांची युवतींची लूट थांबवून एस सी एसटी ओबीसी करिता 50 रुपये अर्ज शुल्क व ओपन करिता 100 रुपये अर्ज शुल्क या सरळ सेवा मेगा भरती साठी शुल्क आकारण्यात यावे व बेरोजगार विद्यार्थ्यांची लूट थांबवावी या मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे डवे व जिल्हा महासचिव मिलींद इंगळे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी अकोला मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आलेले आहे यावर त्वरित निर्णय घ्यावा अन्यथा वंचित बहुजन आघाडी तीव्र आंदोलन करेल असा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला. निवेदन देतेवेळी जिल्हा अध्यक्ष प्रमोद देंडवे,जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे,महिला आघाडी अध्यक्ष प्रभाताई शिरसाठ,जिप अध्यक्ष संगीताताई अढावु, उपाध्यक्ष सुनील फाटकर, आकाश शिरसाट,मायाताई नाईक, गजानन गवई, प्रतिभा अवचार,प्रमोदिनी कोल्हे,कलीम खान पठाण,पुष्पाताई इंगळे, दिनकरराव खंडारे,किशोर जामणीक,अजय शेगावकर, गजानन दांडगे,पवन बुटे,ज्ञानेश्वर सुलताने,राम गव्हाणकर,मधुकर गोपनारायण,शरद इंगोले,नितीन सपकाळ,विकास सदाशिव, देवानंद तायडे,राजकुमार क्षीरसागर,विशाल वाघ,आतिश शिरसाट,प्रमोद इंगळे,संतोष कीर्तक,संदीप शिरसाट,माणिक ठोंबरे,सुरेश कलोरे,शंकरराव इंगोले,डॉक्टर शिराळे,अशोक मेश्राम,गजानन सुरवाडे, शीलवंत शिरसाट,दीपक सावंग,गोपाल भांडे,इत्यादी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.