संदीप टूले
तालुका प्रतिनिधी दौंड
दौंड तालुक्यात डोळ्यांची जोरात साथ सुरू आहे. ही साथ वेगाने पसरत असून घरोघरी डोळे आलेले रुग्ण आढळून येत आहेत. डोळ्यांचे रुग्ण झपाट्याने वाढत असतांना औषधांचा देखील तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे रुग्ण चांगलेच बेजार झाले आहेत. आरोग्य यंत्रणा देखील कोमात गेली आहे असे जाणवते जिवाणूंचा संसर्ग, विषाणूंचा संसर्ग यासह विविध प्रकार डोळे येण्याच्या साथीमध्ये असून हे दोन्ही डोळ्यांचे रुग्ण बरे होण्याचा कालावधी वेगवेगळा आहे. यावर फक्त ड्रॉप्स आणि ॲप्लिकॅबद्वारे त्यावर उपचार करण्यात येत आहेत. मात्र,पूर्ण दौंड तालुक्यात आवश्यक असलेल्या ड्रॉप्स आणि ॲप्लिकॅबचा तुटवडा प्रत्येक मेडिकल मध्ये जाणवत आहे .तसेच आषधे ही आवश्यतेनुसार उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना वणवण फिरावे लागत असून याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच शासकीयसह खासगी रुग्णालयांमध्ये ही हेच चित्र दिसून येत असून डोळे येण्याची साथ शाळांमधून देखील जास्त जोरात पसरत आहे.
शाळेतील विद्यार्थी एकत्रित येत असतात. त्यात अनेकवेळा डोळे आल्यानंतरही काही विद्यार्थी शाळेत हजर राहतात. त्यामुळे साथीचा प्रसार झपाट्याने होत असल्याचे दिसून येते. काही शाळा प्रशासनाकडून या संदर्भात खबरदारी देखील घेण्यात येत आहे. मात्र, त्याला देखील मर्यादा येत असल्याने संसर्ग वाढण्यास हातभार लागत आहे. दरम्यान, दौंड तालुक्यात औषधी विक्रीच्या दुकानामध्ये महत्त्वाच्या आय ड्रॉपचा साठा उपलब्ध नाही. हे लक्षात घेऊन शासकीय रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रावर आरोग्य विभागाने ड्रॉपचा पुरवठा करणे फार गरजेचे असून परिस्थिती हाताबाहेर चालली आहे.काही मेडिकल चालकांनी सांगितले की
रुग्ण संख्या अचानक वाढल्याने ड्रॉप व ॲप्लिकॅबचा नियोजित पेक्षा दुपटीने मागणी वाढली कारण डोळ्यांची साथ आल्यामुळे ड्रॉपचा तुटवडा झाला हा संदेश सगळीकडे पसरल्यामुळे प्रत्येक जण भविष्याची तयारी म्हणून काहींही गरज नसतानाही आधीच ड्रॉप घरी नेऊन ठेवतायत त्यामुळे पण तुटवडा जास्त जाणवत आहे ….


