संजय भोसले
तालुका प्रतिनिधी, कणकवली
भजन प्रेमी व कला संघ कणकवली यांच्या वतीने परमहंस भालचंद्र संस्थान कणकवली येथे जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन केले होते .या स्पर्धेचा निकाल असा – श्री नटराज प्रसादिक भजन मंडळ पिंगुळी द्वितीय तर श्री स्वर संगम प्रसादिक मंडळ कासरल तृतीय. आणि श्री कालिकलेश्वर प्रासादिक मंडळाने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला आहे.तर श्री गुरुप्रसाद प्रासादिक भजन मंडळ करंजी संघाने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले .या शिवाय वैयक्तिक स्वरूपात उत्कृष्ट गायक -चेतन गुरव (श्री काली कलेश्वर प्रासादिक भजन मंडळ), उत्कृष्ट पखवाज वादक- मयूर मिस्त्री ( सिद्धिविनायक प्रासादिक भजन मंडळ जाणवडे), उत्कृष्ट तबलावादक- प्रेम मिस्त्री (श्री गुरुप्रसाद प्रासादिक भजन मंडळ करंजी), उत्कृष्ट झांज वादक -नागेश शिरसाट (श्री पिंपळेश्वर प्रासादिक भजन मंडळ नागवे), उत्कृष्ट कोरस-( श्री साटम महाराज प्रासादिक भजन मंडळ नरडवे), उत्कृष्ट अभंगाचे सादरीकरण – (श्री नटराज प्रासादिक भजन मंडळ पिंगुळी), उत्कृष्ट गजर सादरीकरण (श्री गुरुप्रसाद प्रासादिक भजन मंडळ करंजी ) यांनी वैयक्तिक स्वरूपातील पारितोषिके पटकावली आहेत . स्पर्धेचे विनोद गोखले व मारुती मिस्त्री यांनी परीक्षण केले असून स्पर्धा पार पडल्यानंतर बक्षीस वितरण सोहळा ही घेण्यात आला .या वेळी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघांना वैयक्तिक स्वरूपात बक्षिसे प्राप्त केलेल्यांना रोख रक्कम आणि आकर्षक चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. याप्रसंगी व्यासपिठावर कणकवली भजन संस्थेचे अध्यक्ष तथा माजी उपसभापती प्रकाश पारकर, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी रविकांत मिस्त्री ,जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष गणेश जेठे, उदय राणे नारायण हार्डेकर ,जयप्रकाश मिस्त्री ,गोपीनाथ लाड ,सुदर्शन खोपे, एकनाथ सावंत ,प्रदीप मिस्त्री, गणेश पारकर ,उमेश परब आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.