अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती कुलगुरू यांना वारंवार निवेदन देऊन विद्यापीठ अंतर्गत विविध अभ्यासक्रमाचे असंख्य विद्यार्थी हे नियमित सत्राच्या हिवाळी व उन्हाळी परीक्षा या एकत्रित अल्पावधीतच घेण्यात आल्या.व शैक्षणिक अभ्यासक्रम शिकवणी पूर्ण न झाल्यामुळे असंख्य विद्यार्थी नापास झाले.त्याचप्रमाणे सत्र 2024-2025 ला नवीन शिक्षण धोरण आपल्या विद्यापीठ मध्ये लागू होणार आहे त्यामुळे एक तांत्रिक अडचण निर्माण होणार आहे.आता आपल्या विद्यापीठाची सि.बि.सि.एस. व सि.जी.पि.प्रणालीची परीक्षा पद्धती असून पुढील वर्षी नवीन शिक्षण धोरण लागू झाल्यास त्यांची परीक्षा पद्धती व पेपर वेगळ्या प्रकारे घेण्यात येतील मग जे मागील वर्षाचे सी.बी.सी.एस. व सी.जी.पि.प्रणालीने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे पुढे काय होणार हा प्रश्न निर्माण होईल.त्यामुळे तात्काळ विद्यार्थ्यांना कॅरी ऑन करून पुढील वर्षात प्रवेशासाठी परवानगी देण्यात यावी.संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत रीचेकिंग मध्ये पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांची रीचेकिंग ची फीस परत करण्यात यावी.रीचेकिंग च्या निकालाची वेळ 15 दिवसाची करण्यात यावी.पेपर कायमस्वरूपी प्राध्यापकां कडूनच तपासणी करावी.इत्यादी प्रमुख मागण्यांसाठी आज संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ येथे रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद जिल्हासंघटक आकाश हिवराळे यांच्या नेतृत्वाखाली हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत घोषणाबाजी करून निदर्शने करण्यात आली.यावेळी रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद चे जिल्हासंघटक आकाश हिवराळे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पंकज पोहरे,युवती सेनेच्या जिल्हाप्रमुख खुशी भटकर, मंथन शिंदे ,संभाजी ब्रिगेड चे जिल्हाअध्यक्ष सागर कालमेघ,प्रांजल सदार,रोहित भारसाकळे,अंकुश गावंडे,मंगल डोंगरे,अंकुश तायडे,सागर इंगळे,पंकज इंगळे, हरिष गुडधे,नीरज बडगे,महेश गुडधे,सुरेंद्र अवचार,आशुतोष खंडारे,आदित्य दाणे,सुबोध खंडारे,प्रज्योत खंडारे,कुलदीप वाघमारे,विशाल गोलाईत,तुषार चव्हाण आदींसह असंख्य विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)