विश्वास काळे
ग्रामीण प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड: शहरातील तसेच वार्डातील रस्ते यांची दयनीय अवस्था झालेली असून नगर प्रशासनाकडून स्थानिक पातळीवर होत असलेली उपाययोजना मर्यादित व तोकड्या स्वरूपाची असून त्याचा शहरवासीयांना कोणताही फायदा होताना दिसत नाही.
शहरातील महत्त्वाच्या चौकामध्ये विश्रामगृह, छत्रपती शिवाजी महाराज चौक,ढाणकी रोड, राजे संभाजी महाराज उद्यान सदर वर्दळीच्या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून यापुर्वी रिपब्लिकन युवा सेनेच्या वतीने रस्त्यासंदर्भात निवेदन तसेच आंदोलन केले असता स्थानिक प्रशासनाकडून होणारी उपाययोजना हि अपुरी ठरत असल्याकारणाने तसेच मागील आठवड्यामध्ये झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे पुन्हा एकदा शहरातील रस्त्याची अवस्था दयनीय झालेली आहे. रस्त्याच्या आजूबाजूला झाडे – झुडपे तथा हिरवळ वाढून तसेच खड्ड्यात साचलेल्या पाण्यामुळे साथीचे रोग पसरण्याची दाट शक्यता आहे.
त्या अनुषंगाने रिपब्लिकन युवा सेनेच्या शिष्टमंडळाने नवनियुक्त जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन आपल्या वतीने सदर विषयी तात्काळ दखल घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी अशी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली. तसेच त्यांचे स्वागत करून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी रिपब्लिकन युवासेनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल पाटील चिंचोलकर, शहराध्यक्ष शुद्धोधन दिवेकर, गौतम नवसागरे, भीमराव खंदारे, साहेबराव कदम, नंदू इटकरे व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.











