रितेश टीलावत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा = नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात हिवरखेड नगरपरिषदेची प्राथमिक उद्घोषणा झाली व हिवरखेड वासियांच्या गेल्या 23 वर्षाच्या खडतर संघर्षाला यश येऊन पूर्णविराम मिळाला. मात्र हिवरखेड नगर परिषदेच्या उद्घघोषने मागे आपल्या पदाची पर्वा न करता जी. प., पं. स. सदस्य, ग्रा.प. सरपंच, उपसरपंच व सदस्य यांनी आमदारांना हिवरखेड नगरपरिषद साठी दिलेले ठराव, अकोट मतदार संघाचे विकास महर्षी आमदार प्रकाश भारसाकळे यांनी शासनाला दिलेले नगरपरिषद करण्या बाबतचे पत्र व आमदार भारसाकळे सत्तेत असल्यामुळे त्यांच्या पत्राची दखल घेऊन प्राथमिक उद्घोषणा करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचा सुमधुर मेळ आल्यामुळे हिवरखेड वासियांना अशक्य वाटणाऱ्या नगरपरिषदेच्या मागणीची पूर्तता झाली. हिवरखेड नगरपरिषदेची मागणी पूर्ण झाल्यामुळे हिवरखेड वासीयांच्या आशा पल्लवीत झाल्या मुळे आता विकास महर्षी अकोट मतदार संघाचे आमदार प्रकाश भारसाकळे यांनी हिवरखेड तालुक्याचा प्रश्न ही शासन दरबारी रेटून धरावा या मागणीसाठी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून येथील व्यापारी संघटना, मेडिकल असोशियशन, पत्रकार संघटना, सामाजिक संघटना, भाजपा पदाधिकारीव विविध पक्षाचे पदाधिकारी यांनी आमदार भारसाकळे यांचा वाढदिवस साजरा करून त्यांना व त्यांचा माध्यमातुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस, अजित पवार यांना हिवरखेड नागरी सत्कारा साठी आमंत्रित केले. यावेळी मुन्ना माधणी, लाला सदानी, अनिल कराळे ,रमेश दुतोंडे, संदीप इंगळे, महेंद्र भोपळे, प्रवीण येऊन, बाळासाहेब नेरकर, किरण सेदानी, बाळासाहेब भोपळे, विनोद ढबाले, प्रमोद निळे, सुनील बजाज, आनंद बोहरा, दीपक टावरी, मनोज राठी, रवी वाकोडे, अंकुश हिवराळे,नाना भगत, रामदास गावंडे, किशोर शर्मा,दीपक बोहरा, मो,शफाकत, अन्सारुद्दीन बहोद्दीन, संजय हीवराळे, सुभाष चवरे, दीपक बोहरा, नंदु शिंदपुरे, पत्रकार गोवर्धन गावंडे, केशव कोरडे, साकिब भाई, दानिश खान,सै. मोहसीन यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.


