अजिंक्य मेडशीकर
तालुका प्रतिनिधी मालेगांव
मेडशी येथे कार्यरत शिक्षिका यांची बद्दली रद्द करण्या करिता शाळा शिक्षण समिती व पालक वर्गांचे गटशिक्षण अधिकारी यांना निवेदन दि 2 अगष्ट रोजी देण्यात आले 7 अगष्ट पर्यंत शिक्षकीची बदली रद्द न केल्यास शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा देण्यात आला आहे वर्ग 6 ते वर्ग 8 ला उरला एकच शिक्षक म्हणून शाळा व्यवस्थापन समितीव पालक वर्गाचे पाऊल .प्राप्त माहितीनुसार येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वर्ग १ते वर्ग ८ वि पर्यंत जिल्हा परिषदची उर्दू शाळा असून येथे चार शिक्षक कार्यरत होते यातील एक विज्ञान आणि गणित विषयातील विषय शिक्षिका यांची मेडशी येथून शिरपूर येथे बदली करण्यात आली त्याला शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी विरोध दर्शविला असून विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता शाळा व्यवस्थापन समिती व पालक वर्ग यांनी शिक्षिका परत कार्यरत करण्याबाबत गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन दिले असून सात आगस्ट पर्यंत शिक्षिका कार्यरत न झाल्यास शाळेला कुल ठोकून आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे येथे वर्ग एक ते आठवीपर्यंत उर्दू शाळा असून त्या शाळेवर चार शिक्षक कार्यरत होते तसे शासनाकडून एक ते पाच पर्यंत दोन शिक्षक आणि सहा ते आठवी वर्ग पर्यंत दोन शिक्षक असे चार शिक्षकांची आवश्यकता असताना विषय शिक्षकाची बदली करणे हे अन्यकारक असल्याचे मत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महबूब गवरे यांनी म्हटले तर वर्ग सहा ते वर्ग आठ पर्यंत विद्यार्थ्यांना शिकविण्याचा एका शिक्षकावर सर्व प्रभार आल्यामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात शैक्षणिक नुकसान होत असल्याचे पालक शेख अकबर शेख गुलाब यांचे म्हणणे आहे याबाबत गटशिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क केला असता त्यांचा काही संपर्क होऊ शकला नाही.


