अशोक गायकवाड
ग्रामीण प्रतिनिधी ढाणकी
थोर समाज सुधारक साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे 103 व्या जयंतीनिमित्त येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना समाज बांधवाकडून शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले,
जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचे 103 वी जयंती साजरी करण्यात आली, यावेळी अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी अण्णा भाऊ साठे यांनी केलेल्या कार्याला उजाळा दिला, तर प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले राम गाडेकर, अनिल सोळंके, जॉन्टीभाऊ विनकरे, यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी व्यवस्थापन समितीचे अनिल गायकवाड, प्रमुख पाहुणे म्हणून सभापती संबोधी गायकवाड, दिलीप कलाले, अशोक मोरे, विश्वास धुळे, संदीप मंतेवाड, संदीप गोपेवाड, सविता कानींदे, पराते ताई, वैद्य ताई,शेख आफ्रोस, उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद बचाटे यांनी केले तर तविक मुख्याध्यापिका जवळेकर यांनी केले, आभार प्रदर्शन गोकुळ राठोड यांनी केले, कार्यक्रम समाप्तीनंतर विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले


