कैलास पाटेकर
ग्रामिण प्रतिनिधि ढोरजळगांव
आयुष्यात निश्चित ध्येय ठेवून ध्येयपूर्तीसाठी प्रामाणिक प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळते आणि त्यासाठी व्यसनापासून दूर राहावे आपली आवड निवड जोपासावी असे केल्यास नक्कीच आपण यशस्वी होऊ शकतो असे मत नेवासा पंचायत समितीचे प्रशासक व गट विकास अधिकारी श्री.सुरेश पाटेकर यांनी ढोरजळगाव येथे बोलताना मांडले.कर्मयोगी आबासाहेब काकडे शैक्षणिक समूह शेवगाव यांचे वतीने विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी ह्या हेतूने माझी विद्यार्थी यशोगाथा व संवाद कार्यक्रमाअंतर्गत आज विद्यालयाचे १९८२ चे इ १० वी चे माजी विद्यार्थी श्री.सुरेश विठ्ठलराव पाटेकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.यावेळी मनोगतात पुढे बोलताना म्हणाले की विद्यालयीन जीवनात अतिशय सामान्य संपादणूक असणारा माझ्या सारखा विद्यार्थी तालुक्याच्या पदापर्यंत मजल मारू शकतो हे आपण समजून घेतले पाहिजे.गावाचा विकास प्रामुख्याने तीन गोष्टीवर ठरवला जातो गावातील शाळेतून मिळणारे शिक्षण,गावातील लोकांचे आरोग्य आणि जन्म आणि मृत्यचा दर याशिवाय अधिकारी जीवनातील ऐश्वर्य मिळणारा मानसन्मान याबरोबरच वाट्याला येणारा संघर्ष अतिशय सुलभ शब्दात विद्यार्थ्यांना समजाऊन सांगितला.सदर कार्यक्रमास विद्यालयाचे प्राचार्य संजय चेमटे यांचेसह पर्यवेक्षक सुनील जायभाये,संस्था प्रतिनिधी सुरेश तेलोरे,भाऊसाहेब टाकळकर,सुधाकर आल्हाट तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ईश्वर वाबळे यांनी तर आभार विद्यालयाचे प्राचार्य चेमटे सर यांनी मानले.