राजेंद्र पोटफोडे
ग्रामीण प्रतिनिधी, अमरापूर
अमरापूर:आज दि 5 ऑगस्ट 2023 रोजी शेवगाव तालुक्यातील अमरापुर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे इयत्ता ५ वी व ८ वी च्या वर्गाचे शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन वर्ग व शिक्षक पालक सहविचार सभा आयोजित केली होती.या वेळी कर्मयोगी आबासाहेब काकडे,व स्व निर्मलाताई काकडे यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षिका श्रीम उज्ज्वला नांगरे यांनी केले.आजच्या शिक्षक पालक सभेच्या अध्यक्षस्थानी पालक ज्ञानेश्वर डोईफोडे हे होते.यांनी शाळेमार्फत राबविल्या जात असलेल्या विविध उपक्रमाबद्दल शाळेचे कौतुक केले.यावेळी सह शिक्षक अशोक जाधव यांनी शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्गाच्या संदर्भात पालक वर्गात सविस्तर माहिती दिली ही शिष्यवृत्ती परीक्षा विद्यार्थ्यांच्या पुढील भवितव्यासाठी निश्चितच उपयोगी ठरते विद्यार्थ्यांना आतापासूनच अभ्यासाची सवय लागते असे मार्गदर्शन केले. ज्ञानासारखे पवित्र दुसरे काहीच नाही कर्मयोगी आबासाहेब काकडे यांनी अमरापूर येथे लावलेले रोपटे आज वटवृक्ष होत आहे असे प्रतिपादन प्रमुख अतिथी ह भ प काकासाहेब महाराज मुखेकर यांनी केले.यावेळी प्राचार्य गणपत शेलार यांनी आपल्या भाषणात संस्थेकडून राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी शाळेबरोबरच संस्थेचाही सिंहाचा वाटा आहे.विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधने हेच शाळेचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन केले. विद्यार्थ्यांच्या समस्या या शिक्षक आणि पालक दोघांनी मिळून सोडवणे गरजेचे असते असे मतही व्यक्त केले.विद्यालयाच्या विविध उपक्रमाची माहिती देत शाळेचा उंचावलेला आलेख मांडला.पालक प्रतिनिधी विराट बोरुडे अशोक कळमकर श्रीम खताळ मावशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी पालक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचलन व आभार शशिकांत काकडे यांनी मानले .