संजय भोसले
तालुका प्रतिनिधी,कणकवली
शासनाच्या योजना कितीही चांगल्या असल्या तरी त्या लाभार्थ्यापर्यंत घेऊन जाणारे अधिकारी व कर्मचारी यांची मानसिकता काय आहे त्यावर सरकार आणि त्यांची प्रतिमा जनतेत तयार होत असते .असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी महसूल दिनाचे औचित्य साधून केलेल्या आयोजित कार्यक्रमात वक्तव्य केले.” एक हात मदतीचा” या कार्यक्रमात ते बोलत होते . कुडाळ येथील सिद्धिविनायक हॉलमध्ये महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘महसूल सप्ताह’ या उपक्रमा अंतर्गत उपविभागीय अधिकारी कार्यालय कुडाळ व तहसीलदार कार्यालय कुडाळ आयोजित जिल्हास्तरीय एक हात मदतीचा या कार्यक्रमाचा समारंभ पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाला. यावेळी व्यासपीठावरती जिल्हाधिकारी के मंजू लक्ष्मी, जिल्हा पोलीस अधीक्षक सौरव कुमार अग्रवाल ,जिल्हा परिषद मुख्याधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर अप्पर, जिल्हाधिकारी संतोष बर्गे, प्रभाकर सावंत!, निवासी जिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, परीक्षा विधीन जिल्हाधिकारी करिष्मा नायर, विशाल खत्री, कुडाळ प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे ,तहसीलदार अमोल पाठक भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत ,आदि मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमांमध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांमधून अर्थसहाय मिळणाऱ्या लाभार्थ्यांना त्यांच्या लाभाचे वाटप करण्यात आले. शिवाय पुरात वाहून जाणाऱ्यांना स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवणाऱ्या धाडसी तरुणांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपेक्षित असलेला भारत आता तयार होत आहे. लोकांपर्यंत योजना जात आहेत. अजूनही काम करण्याची पद्धत बदलण्याची गरज असून यामध्ये आपण यशस्वीतेकडे जाऊ . खऱ्या लाभार्थ्यापर्यंत शासकिय योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. योजना कितीही चांगली असली तरी ती लाभार्थ्यांपर्यंत घेऊन जाणारा अधिकारी व कर्मचारी हा सर्वात महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. जिल्ह्यातील तरुणांचे शहराकडे होणारे स्थलांतर थांबवण्यासाठी तरुणांना जिल्ह्यातच कौशल्य प्रशिक्षण देण्यावरती भर देण्याची गरज आहे. त्यासाठी पालकमंत्री म्हणून लागेल ती मदत करायला आपण तयार आहोत. शिवाय पुरामध्ये वाहून जाणाऱ्यांना ज्या धाडसी तरुणांनी वाचवले आहे त्यांना रोख रकमेचे पारितोषिक ही दीले जाईल असे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की यापुढे येणारा प्रत्येक दिवस हा “महसूल दिन” म्हणून साजरा करायचा आहे .समाजातील दुर्बल घटक एखादा पुरावा नाही म्हणून शासकीय योजनेपासून वंचित राहणार नाही त्यासाठी प्रयत्न केले जातील. जिल्ह्यातील सर्व विभागांना सोबत घेऊन महसूल विभाग जनहितार्थ कार्य करत राहील. असे सांगून जिल्ह्यातील आठ पैकी सहा तहसीलदारांना नवीन वाहने मंजूर केल्याबद्दल पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे आभार व्यक्त करण्यात आले.या कार्यक्रमाला जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी वर्ग मोठ्या संखेने उपस्थित होता.


