मुकेश मेश्राम
जिल्हा प्रतिनिधी भंडारा
भंडारा : जिल्हा काँग्रेस तर्फे राहुल गांधी यांच्यावरील खटल्याचा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा स्वागत करीत आतिषबाजी करून व मिठाई वाटून जिल्हाधिकारी कार्यालया समोर जल्लोष करण्यात आला. भारतीय जनता पक्षाच्या हुकूमशाही, मनमानी व सुडबुद्धीच्या राजकारणातून राहुल यांना शिक्षा झाली होती. खोट्या तक्रारीच्या माध्यमातून भाजपाने हे षडयंत्र रचले होते. आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. मोदी आडनावारून गुजरात कोर्टाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावणी होती. त्यामुळे त्यांची खासदारकी रद्द करण्यात आलेली होती. आज सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती देत त्यांना खासदारकी बहाल केली आहे. राहुल गांधींनी लोकसभा अध्यक्षांना एक पत्र दिल्यानंतर त्यांना पुन्हा सदस्यत्व मिळणार आहे. याबाबत प्रतिक्रिया देतांना काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष मोहन पंचभाई यांनी निर्णयाचं स्वागत केलं. ते पुढे म्हणाले की, आजचा निर्णय ही समाधानाची बाब आहे. क्षुल्लक गोष्टीवरुन सदस्यत्व रद्द करणं हा निर्णय लोकशाहीला मारक होता. परंतु कुठेतरी सत्याचा विजय होतोच, ते आज झालं. आता राहुल गांधी यांना पुन्हा खासदारकी बहाल होईल, यात संशय नाही. कोर्टाच्या निर्णयावर प्रतिक्रिया देतांना महिला जिल्हाध्यक्ष सौ जयश्री ताई बोरकर म्हणाल्या की, देशात लोकशाही शिल्लक आहे, हे आज दिसून आलं. चुकीच्या पद्धतीने दिलेल्या शिक्षेला स्थगिती मिळालेली आहे. कोर्टाने केलेलं निरीक्षण आणि घेतलेल्या निर्णयाचं मी स्वागत करते. आता राहुल गांधी लोकसभेमध्ये लढतांना दिसतील, असं त्यांनी सांगितले म्हणाल्या. यावेळी जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई, जी प अध्यक्ष गंगाधर जी जिभकाटे, महिला जिल्हाध्यक्ष सौ जयश्री ताई बोरकर, जी.प सभापती रमेश पारधी, सभापती मदन रामटेके, सभापती स्वाती वाघाये, माजी जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, जी प सदस्य प्रेम वनवे, नारायण वरठे, गायत्री वाघमारे, अनिता भुरे, मनीषा निंबार्ते, शीतल राऊत, सरिता ताई कापसे, विशाखा माटे, विद्या डुंभारे, कविता उइके, देवा इलमे, कृष्णकांत बघेल, पूजा हजारे, संगीता बोरकर, मंजुषा चौव्हाण, धनंजय तिरपुडे, शमीम शेख, राजकपूर राऊत, गजानन झंझाळ, राजू निर्वान, प्रमोद तितिरमारे, नरेंद्र वाघाये, संजय सार्वे, विजय कापसे, जगदीश उके, प्रमोद मानापुरे, गणेश निमजे, विनीत देशपांडे, पवन मस्के, भगवान नवघरे, सोनू कोटवानी, बिट्टू सुखदेवे, इम्रान पटेल, निशांत गणवीर, स्वाती हेडाऊ, श्रीकांत बन्सोड, आकाश बोन्द्रे, बिट्टू राऊत, विपीन बोरकर, हेमंत बांडेबूचे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.