कैलास खोट्टे
तालुका प्रतिनिधी संग्रामपूर
सोनाळा येथील सोनाजी वाटिका परिसरातील गजानन महाराज मंदिर मध्ये दर गुरुवारी हजारो भाविक महाप्रसाद घेत असतात.पंचक्रोशीतील भाविक भक्त महाप्रसाद घेत असतात वेगवेगळे कीर्तन,भजन मंदिरात राबवले जातात. आज संकष्ट चतुर्थी निमित्त १००८ मोदकाचा प्रसाद अर्पण करण्यात आला.भाविकांनी आज श्री चे दर्शन घेऊन प्रसादाचा लाभ घेतला.अशाच भक्तीमुळे मंदिरातील वातावरण प्रसन्न असते.