प्रकाश केदारे
तालुका प्रतिनिधी पाथरी
पाथरी : येथे रविवार दि.6-8-2023 रविवार रोजी दु.12वा. साहित्यरत्न, लोकशाहीर कॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या 103 वी जयंती महोत्सव 2023 निमित्त संघर्ष समतेचा संच प्रबोधनात्मक शाहिरी जलसा सादर करते शाहीर चंद्रकांत हिवाळे व संच पाथरी तसेच या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित केला आहे . या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. आमदार बाबा जानी दुर्रानी साहेब विधान परिषद सदस्य महा. राज्य तर उद्घाटक म्हणून अँड. मुंजाजी भाले पाटील ज्येष्ठ नेते रा. काँ. पा. व प्रमुख व्याख्याते प्रा. विठ्ठल कांगणे सर परभणी व दीपक कदम सर आंबेडकरवादी मिशन, नांदेड हे आहेत. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती मा. जुनेद भैया दूराणी, अनिल नखाते ,सुभाष आबा कोल्हे ,श्याम भाऊ धर्मे, आनंद धनले, सदाशिव थोरात, हन्नान खान दुर्राणी,तबरेज दादा दुर्राणी, तारेख खान दुर्रानी, दीपक गवारे, मीना नितेश भोरे, आलोक चौधरी, लालू खान, एजाज खान, गोविंद हरकळ, सुधाकर क्षीरसागर, मुख्तार अली, राजू शेठ पामे, कलीम अन्सारी, रज्जाक खुरेशी, खालिद दादा, नसीर तात्या, आरिफ खान, अश्फा खान, यासीन पठाण, यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. संयोजक समिती अध्यक्ष दत्ताभाऊ मायंगळे, कार्याध्यक्ष रिंकू पाटील, उपाध्यक्ष विठ्ठल कदम, संघटक विष्णू हरिश्चंद्र गवारे व उत्तम पुंजाजी गवारे, सह संघटक विकास तुकाराम कांबळे, सचिन रमेश कांबळे, सुरेश विठ्ठल गवारे, सल्लागार अँड रवी दादा कांबळे ,अँड अशोक गालफाडे, अँड भगवान हिवाळे, रामभाऊ हिवाळे, राजू साठे, अँड सुशील भोरे, अँड विकास कांबळे, सह-सल्लागार भारत दाढेल, सुनील लोंढे, संतोष हिवाळे, बळीराम उपाडे व सर्व विनीत जैतापूर मोहल्ला, लहुजी कॉलनी, आदर्श नगर, फुलेनगर, नामदेव नगर, सम्राट नगर, विलास गोपले नगर, लहुजी नगर, नगरपरिषद कॉलनी, माळीवाडा, साठे नगर सदरील कार्यक्रमास संयोजक आयोजक यांच्या वतीने दि.6 ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता राजमाता अहिल्याबाई होळकर नवीन आठवडी बाजार, पाथरी या ठिकाणी हजर राहण्याचे आव्हान केले आहे.