बबनराव धायतोंडे
जिल्हा प्रतिनिधी पुणे
दौंड: राजेगाव ता.दौंड येथे मागिल आठवड्यापासून शिंग्रोबामाळ_ राजेगाव येथे बिबट्याची दहशत पाहिला मिळत आहे.रविवारी दिनांक 30 बिबट्याने एका पाळीव कुत्र्याला ठार मारत अर्धवट खाऊन टाकले आहे. तेव्हापासून तर शिंग्रोबामाळ येथील शेतकऱ्यांना धडकी भरलेली आहे. यामुळे येथील शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. या बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकऱ्यांची शेतातील कामे रखडले आहेत. त्यामुळे शेतकरी मात्र पूर्ण हवालदिल झालेला आहे. येथील नागरिक, लहान मुले,महिला, व्रृद्ध बाहेर पडण्यास घाबरत आहेत. येथील काही नागरिकांनी सांगितले की भटक्या कुंत्र्यांची संख्या फार कमी झालेली आहे. या बिबट्याने त्यांचा फाडशा पाडलेला असावा असा अंदाज येथील नागरिक व्यक्त करीत आहेत.येथील नागरिकांचा व पाळीव प्राण्यांचा नाहक बळी जाऊ नये म्हणून वनविभागाने तात्काळ पिंजरा लावावा अशी मागणी येथील राजेगाव चे सरपंच माऊली लोंढे यांनी केली आहे.आणि तसा वनविभागाशी ग्रामपंचायतीने पत्रव्यवहार देखील केलेला आहे असे सरपंच माऊली लोंढे म्हणाले.दौंड च्या वनविभागाच्या अधिकारी गोडसे मँडम यांच्याशी संपर्क साधाला आसता त्या म्हणाल्या की पिंजऱ्याची मागणी केलेली आहे आम्हाला उपलब्ध झाला की पिंजरा लावण्यात येईल. आणि आमचे कर्मचारी वेळोवेळी स्थळ पाहणी करत आहोत.










