मुकेश मेश्राम
जिल्हा प्रतिनिधी, भंडारा
भंडारा : येथील शिवाजी वार्ड नगर परिषदेच्या सार्वजनिक नालीवर अवैधरित्या टिनाचे दुकान, लोखंडी काउंटर लावून अतिक्रमण केले असून अवैध रित्या दारू व अंड्याचे दुकान लावून सार्वजनिक जागा हडपण्याच्या प्रकाराकडे नगर परिषद आर्थिक व्यवहारातून जाणीव पूर्वक दुर्लक्ष करीत असल्याच्या विरोधात आजपासून स्थानिक जेष्ठ नागरिक व महिला तर्फे 1आगस्ट पासून आमरण उपोषणाला सुरवात करण्यात आली आहे.संदर्भात जी एच. भुगांवकर अपर जिल्हाधिकारी भंडारा यांच्या न्यायालयात अतिक्रमण या विषयावर लेखी निवेदनआले होते. त्या नुसार अप्पर जिल्हाधिकारी जी.एच भुगांवकर यांनी एक आदेश पारित केला त्या मध्ये बालविकास प्रकल्प अधिकारी भंडारा यांच्या शिवाजी वार्ड मधील अंगणवाडी ३ करीता ही जागा मागणीचा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी भंडारा, मुख्यधिकारी भंडारा यांचेकडे तात्काळ सादर करावा. आणि मुख्यधिकारी उपविभागीय अधिकारी भंडारा यांनी या सरकारी जागेवरील अतिक्रमण हटवून ती जागा या अंगणवाडी बांधकमाकरिता देण्यात यावी अशा आदेश प्राप्त झाला. परंतु आदेशाचे 46 दिवस होऊन व वेळोवेळी पाठपुरावा करून सुद्धा मुख्यधिकारी विनोद जाधव नगर परिषद भंडारा यांनी या आदेशा कडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करून आता पर्यंत कुठल्याही प्रकारची कार्यवाही केली नाही. या करिता या परिसरातील सुज्ञ नागरिक नरेंद्र रामटेके यांनी जिल्हाधिकारी यांना या जागेवरील अतिक्रमण हटवून अंगणवाडी ची इमारती करीत जागा मोकळी करून देण्यासाठी दि. २७ जून रोजी निवेदन दिले होते. पाच दिवसात सदर जागेवरील अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही न झाल्यास 1 ऑगस्ट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशाराही दिला होता. मात्र पाच दिवस संपूनही संबधित विभाग व नगर परिषदेकडून कोणतीही कारवाई झाली नसल्याने शेवटी शिवाजी वॉर्डातील जेष्ठ नागरिक नरेंद्र रामटेके व वॉर्डातील महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. सदर जागेवर असामाजिक तत्वाच्या लोकांनीअतिक्रम केले असून त्या ठिकाणी अवैध कामे केल्या जात असून सर्वसामान्य नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. जेव्हा की सदर जागा जिल्हाधिकारी यांनी नगर परिषदेला अंगणवाडी ला देण्यात यावी असे आदेश असतांनाही न.प. मुख्याधिकारी जाणीव पूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने सामान्य नागरिकांना उपोषण करावा लागतो असे खेदाने म्हणावे लागत असून .सदर जागेवरून अवैध अतिक्रमण हटवून त्या जागेवर अंगणवाडी च्या बांधकामाला सुरुवात केल्या शिवाय उपोषण सोडणार नाही असे मनोदय उपोषण कर्ते नरेंद्र रामटेके यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले.