रमेश शिंगोटे
तालुका प्रतिनिधी संगमनेर
जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे निझणेश्वर कोकणगाव येथे आज लोकमान्य टिळक व शाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व विद्यालयाच्या 39 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून विद्यालयात गरीब विद्यार्थी फंडाची स्थापना करण्यात आली. या गरीब फंडाचा उद्देश विद्यालयामध्ये शिकणारे गरीब कुटुंबातील विद्यार्थी यांना अर्थसहाय्य, शालेय साहित्य, गणवेश व शिक्षणाच्या प्रवाहातून वंचित राहू नये यासाठी या फंडाची संकल्पना विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री वाकचौरे डी.पी सर यांनी मांडली कोकणगाव परिसरात विविध उपक्रम घेणाऱ्या विद्यालयाला आज 39 वर्ष पूर्ण होत आहेत. या शुभ दिनी विद्यालयाचे माजी विद्यार्थी, प्रगतीशील शेतकरी श्री. सोमनाथ गजानन जोंधळे यांच्या शुभहस्ते या गरीब विद्यार्थी फंडाची फित कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी श्री सोमनाथ जोंधळे यांनी 2100 रुपये. गरीब विद्यार्थी फंडाचा देणगी पेटीत टाकून चांगल्या कामाची सुरुवात केली. व्यापार संघ व्यासपीठावर श्री.रावताळे बी .एम ., श्री. खरात सर , श्री .खेमनर सर, श्री. कांबळे सर, श्रीमती जोंधळे मॅडम, श्री. दीपक राहणे, श्री .भालेराव सर, श्री राहणे दिलखुश उपस्थित होते.यावेळी लोकमान्य टिळक व शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्यध्यापक श्री. वाकचौरे डी.पी.सर यांनी केले सूत्रसंचालन श्रीमती पवार व्ही के मॅडम , व श्री .गोसावी डी.बी.सर यांनी केले तर आभार श्री. घोडे ए .वाय .सर यांनी मानले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी बहुमोल परिश्रम घेतले.