रितेश टीलावत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा :आज दिनांक १ ऑगस्ट २०२३ मंगळवार रोजी गट ग्रामपंचायत वाडी अदमपूर ,जाफरापूर द्वारे महसूल दिनाचे औचित्य साधून गावातील नागरिकांना आपल्या मालमत्ता प्रॉपर्टी कार्ड चे वाटप तेल्हारा तहसीलचे नायब तहसीलदार राणे साहेब सरपंच रुपेश वल्लभदास राठी, उप सरपंच विठ्ठल खारोडे, तेल्हारा तालुका भूमी अभिलेखचे सोहनलाल पालवे, उपअधीक्षक भूमी अभिलेख चे कर्मचारी अजय भगत, संजय हराळे, ग्रामसचिव फाडके, मॅडम यांच्या हस्ते प्रॉपर्टी कार्ड शासकीय फी भरून देण्यात आले. कार्यक्रमाला ग्रामपंचायत चेपदाधिकारी मंगेश वाघ, कैलासभाऊ कोतकर, सुरेंद्र भोंगळ, शेषराव बोदडे, हरिभाऊ ठाकूर, दीपक भाकरे, ग्रामपंचायत कर्मचारी त्यांची या कार्यक्रमाला उपस्थिती लाभली.
गावातील नागरिकांनी या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद व सहकार्य दिल्याबद्दल ग्रामपंचायत वतीने सरपंच रुपेश राठी यांनी आलेल्या सर्व मान्यवर अधिकारी व गावातील लोकांचे आभार मानले.सरपंच महासंघाचे तेल्हारा तालुका चे अध्यक्ष व वाडी अदमपूर, जाफरा पूरचे सरपंच रुपेश वल्लभदास राठी यांचा लोकहिताचा एक चांगला उपक्रम आपल्या गावा मध्ये राबविला.











