भारत भालेराव
ग्रामीण प्रतिनिधी, शेवगाव
शेवगाव: सुधारित ताजनापूर लिफ्ट टप्पा क्र एक या योजनेत वरूर खु, वरूरबु,आखेगाव,थाटे,खरडगाव,वाड गाव,सालवडगाव,मुर्षदपूर,हसनापूर या नऊ गावांचा समावेश करून शेवगाव तालुक्याच्या हक्काचे पाणी या गावांना देण्यासंदर्भातील प्रस्तावास त्वरित मंजुरी देऊन प्रकल्पाचे काम लवकरात लवकर सुरू करावे या मागणीसाठी नऊ ऑक्टोबर रोजी क्रांती दिनी अधिकाऱ्यांना प्रदक्षिणा आंदोलन व प्रश्न सुटत नाही तोपर्यंत मुक्काम ठोको आंदोलन करणार असलेबाबतचे निवेदन अँड डॉ शिवाजीराव काकडे व जि प सदस्या सौ हर्षदाताई काकडे यांच्या अध्यक्षतेखाली अहमदनगर लाभक्षेत्र विकास प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता व प्रशासक बी के शेटे साहेब व कार्यकारी अभियंता श्री जगदीश पाटील साहेब यांना नगर येथे देण्यात आले. यावेळी लहू जायभाये,दादापाटील सातपुते,बळीराम शिरसाठ,नवनाथ ढाकणे, विक्रम ढाकणे,शेषराव ढाकणे,अर्जुन खंडागळे,सरपंच सर्जेराव जवरे,महादेव जवरे,डॉ अंकुश दराडे,माणिकराव म्हस्के, गणेश मोरे,कानिफनाथ उभेदळ, मच्छिंद्र वावरे,शिवाजी वावरे,उद्धव वावरे,अजिनाथ लांडे,नारायण टेकाळे,शिवाजी औटी,सकाहरी भापकर,बाप्पासाहेब लांडे,भगवान डावरे,भाऊसाहेब बोडखे,ज्ञानेश्वर बोडखे,राजेंद्र लोणकर,एकनाथ बोडखे,आदिनाथ धावणे,रंगनाथ ढाकणे,श्रीधर धावणे,बाबासाहेब ढाकणे,मुरलीधर धावणे,अशोक गोर्डे उपसरपंच,भगवान गोर्डे,पाराजी मराठे,राहुल पाबळे,अशोक कोल्हे आदि शेतकरी व कार्यकर्ते यावेळी प्रमुख उपस्थितीत होते.


