शेषराव दाभाडे
तालुका प्रतिनिधी,नांदुरा
आज दिनांक ०१ ऑगस्ट २०२३ रोजी स्थानिक बुलढाणा येथील वंचित बहुजन युवा आघाडीच्या जिल्हा कार्यालयामध्ये वंचित बहुजन युवा आघाडीची बैठक युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आली. युवा आघाडीच्या वतीने सुशिक्षित बेरोजगारांच्या विविध मागण्यांच्या संदर्भात दिनांक १४ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ११ :०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा या ठिकाणी धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे .यासंदर्भात बैठकीदरम्यान सविस्तर चर्चा करण्यात आली व नियोजन संदर्भात कोअर कमिटी गठीत करून जबाबदारीचे वाटप करण्यात आले.तसेच मोर्चा शिस्तबद्ध व यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी पदाधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या. या मोर्चाला सुशिक्षित बेरोजगार तरुणांचा प्रचंड प्रतिसाद आहे. या बैठकीला जिल्हा महासचिव अर्जुन खरात, जिल्हा संघटक बाला राऊत, जि. प. सर्कल प्रमुख अनिल पारवे, बुलढाणा तालुका उपाध्यक्ष विजय पवार, सचिव किरण पवार शाखाप्रमुख समाधान पवार, चिखली तालुका अध्यक्ष राहुल वानखेडे, उपाध्यक्ष संजय वानखेडे, देऊळगाव राजा तालुकाध्यक्ष संतोष कदम, ॲड.कैलास कदम ,तालुका सल्लागार उत्तम पैठणे, विधि सल्लागार ॲड.एस एस सुरडकर, मेहकर तालुका अध्यक्ष डॉ. राहुल दाभाडे, बुलडाणा संघटक प्रेमकुमार टुनलाईट,लोणार तालुका अध्यक्ष गौतम गवई , मोताळा तालुका युवा सतीश गुरचवळे, सदाशिव वानखेडे, पवन अवसरमोल, योगेश हिवाळे ,निलेश वाघ ,प्रदीप सरदार, समाधान पडघान सह पदाधिकारी उपस्थित होते या मोर्चामध्ये सुशीक्षित बेरोजगार तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.