बिहारीलाल राजपूत
तालुका प्रतिनिधी भोकरदन
भोकरदन: भोकरदन तालुक्यातील मौजे आव्हाना येथे शासकीय आदेशानुसार शासन आपल्या दारी या विषयावरील ग्रामसभा दिनांक १ ऑगस्ट २३ रोजी संपन्न झाली.या सभेत आव्हाना गावासाठी नियुक्त असलेले सर्व श्री बि.जि. सुरडकर ग्रामविकास अधिकारी,जे.बि. राजपुत ग्रा.प. लिपिक,जि.पी.उजागरे जि. प्रा.शाळा मुख्यापक,डी.एस. पाडळे सह शिक्षक,के.वाय. तडवी सह शिक्षक, बी.टी.गवळे सह शिक्षक,एस.के.कोल्हे सह शिक्षक,बी.ए. सपकाळ सह शिक्षक,एस.के.सपकाळ सह शिक्षक,एस.जे.गावंडे सह शिक्षक,आर.एस.डोभाळ प्रा.आ. उप संच कर्मचारी,जे. डी. सरदार आरोग्य कर्मचारी,छाया राजू शिंदे अंगणवाडी,वैशाली मोतीलाल राजपुत अंगणवाडी,वंदना प्रल्हाद जाधव अंगणवाडी,रुखमनबाई हिम्मतराव काळे अंगणवाडी,पी.एम. वाघ तलाठी,
श्रीमती एन.एन.गावंडे कृषी सहायक,अंकुश जाधव वायरमन,
असे शासकीय अधिकारी व कर्मचारी हजर होते.सदर ग्रामसभा ग्रामपंचायत कार्यालयासमोर आयोजित करण्यात आली होती. शासनाच्या विविध विभागाच्या विविध कर्मचारी यांनी आपापल्या विभागाची शासकीय योजनांची माहिती ग्रामस्थांना दिली. हेळीमेळीच्या वातावरणात ग्रामसभा पार पडल्या बद्दल सरपंच सौ.रेणुका राम दुधे यांनी उपस्थिती ग्रामस्थांचे आभार मानले.सभेसाठी बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.