नंदकुमार कावळे
तालुका प्रतिनिधी, महागाव
महागाव: श्री सत्य साई सेवा समिती तर्फे महागाव तालुक्यातील तिवरंग आणि धनोडा हया पूरग्रस्त भागातील 50कुटुंबांना किराणा किटस्, भांडे आणि कपडे वाटप करण्यात आले माणसात देव पह हया श्री सत्य साई बाबा यांच्या शिकवणी नुसार सेवा कार्य करणाऱ्या साई समितीचे साई सेवक गरजु लोकांची सेवा करीत असतात श्री सत्य साई सेवा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सातपुते सर यांनी पूरग्रस्त गावाची पाहणी करून. तेथील पुरामुळे आतोनात नुकसान झालेल्या कुटुंबाची प्रेमाने विचार पुस केली. आणि त्यांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप केले यावेळी तिवरंग येथील सरपंच जयश्री राठोड यांनी श्री सत्य साई संघटनेचे आभार मानून त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले यावेळी सोबतच धनोडा येथील पैनगंगा नदी काठावरील १५ कुटुंबांना ही जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले त्यावेळी तिथे उपस्थित असलेले पत्रकार आणि सामाजिक कार्य करणारे अनिल बोंपिलवार यांनी साई समितीने आभार मानले समितीचे डॉ भेंडे ज्येष्ठ साई भक्त संजय चिंतामणी अरुण धुमाळ वानोळे साहेब संजय मैंद इंगळे सर, अमोल आडे अक्षय असोले, नीलेश देशमुख सौ भेंडे मॅडम आणि सौ चिंतामणि मॅडम ह्यांनी साई सेवा अर्पण केली.











