करामत शाह
ग्रामीण प्रतिनिधी, आगर
अकोला: शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पिक विमा योजना लागू झाली परंतु ऑनलाइन अर्ज करण्यासाठी असलेली सर्व्हर सतत डाऊन असल्याने अनेक शेतकरी या लाभापासून वंचित राहण्याची भीती आहे. त्यामुळे या योजनेला मुदतवाढ मिळावी अशी मागणी रयत शेतकरी संघटनेचे प्रभारी विदर्भ पश्चिम युवा अध्यक्ष, पुर्णाजी खोडके यांनी मुख्यमंत्री व कृषिमंत्री , उपमुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनातून केली आहे, पिक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांना कर्ज भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023 ही आहे परंतु पंधरा दिवसापासून ज्या साइटवर अर्ज भरणे जातात ची साईट अत्यंत स्लो आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अर्ज भरणे शक्य होत नाही एकीकडे यावर्षी पेरणी उशिरा झाली, व विमा योजना लागू झाली. यांचा प्रचार प्रसार वेळेने झाला. त्यामुळे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी एक रुपया पिक विमा योजना राबविली जाते त्या योजनेचा उद्देश सफल होत असल्याचे येत नाही त्याकरिता संपूर्ण शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा याकरिता या योजनेला मुदत वाढ मिळणे गरजेचे आहे. याकरिता मुख्यमंत्री, व कृषिमंत्री उप मुख्यमंत्री यांचें निवेदन
ई-मेल द्वारे पाठवुन मागणी रयत शेतकरी संघटनेचे प्रभारी विदर्भ पश्चिम युवा अध्यक्ष पुर्णाजी खोडके यांनी केली आहे….