संदीप टुले
तालुका प्रतिनिधी, दौंड
पुण्यासह राज्यात मोठ्या प्रमाणात औषधांची ऑनलाइन खरेदी करण्याकडे कल वाढत आहे. मात्र, ऑनलाइन मिळणाऱ्या औषधांच्या गुणकारीपणाबद्दल प्रश्नचिन्ह उभे राहात असल्याच्या काही घटना पुढे येत आहेत.त्यामुळे सरकार ने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे असे मा.आमदार जगन्नाथ शिंदे अध्यक्ष ए.आय.ओ.सी.डी.सदस्य महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषद यांनी पुणे येथील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते.पुढे बोलताना ते म्हणाले की ऑनलाइन औषध विक्रीला किरकोळ औषध विक्रेत्यांनी कडाडून विरोध केला पाहिजे,ऑनलाइन औषध खरेदी वाढल्याने त्याची थेट स्पर्धा किरकोळ औषध विक्रेत्यां बरोबर होत असून देशात जवळपास १२ लाख केमिस्ट बांधव असून त्यांच्यावर ७ कोटी लोकांचे जीवनमान अवलंबून आहे जर ही ऑनलाईन औषधांची विक्री थांबली नाही तर यांच्यावर उपासमारीची वेळ येईल यामुळे बनावट आणि दुय्यम दर्जाच्या औषधांचे बाजारपेठेतील प्रमाण ही वाढले असल्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका वाढला आहे डॉक्टरांच्या चिठ्ठीवरच मिळणारी औषधे आता ऑनलाइन सहज मिळायला लागल्यामुळे गर्भपाताची औषधे,झोपेची औषधे, नशा करणारी औषधे,मुलांना सहजाच मिळू लागली आहेत त्यामुळे आजची तरुणाई भरकटू शकते. आज जे औषध दुकानांमधून डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध मिळतच नाही, तेच औषध बिना चिट्टीचे ऑनलाइन सहजाच मिळत आहे दुकानांमध्ये फार्मासिस्टच्या उपस्थितीतच औषध विक्री करण्याचे बंधनकारक आहे. मात्र,ऑनलाइनसाठी हे बंधन नाही.कायदा काय सांगतो डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आणि फार्मासिस्ट नसताना औषधाची विक्री करू नये, या अटीचे पालन ऑनलाइन औषध विक्रेते करत नाही ,या नियमांचे पालन न करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली पाहिजे. पण ते तसे होताना दिसत नाही.पुढे बोलताना अनिल नावंदर( मानद सचिव एम.एस.सी.डी.ए.) म्हणाले की केमिस्ट लोकांनी पण आता आपल्या व्यवसायाकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे काळानुरूप दुकानामध्ये बदल केले पाहिजे कारण येणारा काळ खूप आव्हानात्मक असणार आहे.कारण भारताचे व्यवसायासाठी मार्केट मोठे असल्यामुळे अनेक विदेशी कंपन्या व्यवसायासाठी भारतात येणार आहेत त्यामुळे किरकोळ विक्रेत्याने आपला व्यवसाय कसा वाढेल याकडे लक्ष दिले पाहिजे.
यावेळी विजय पाटील (अध्यक्ष महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषद) म्हणाले की फार्मसी महाविद्यालयाच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असल्यामुळे दर वर्षी अनेक विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडत आहेत त्यामुळे केमिस्ट बांधवांकडे दोनच पर्याय उपलब्ध असतील एकतर व्यवसाय वाढण्यासाठी नवनवीन युक्त्या वापरून व्यवसाय वाढवला पाहीजे नाहीतर व्यवसायात बद्ल केला पाहिजे.या कार्यक्रमावेळी संघटनेचा वार्षिक अहवाल अनिल बेलकर व रोहित करपे यांनी मांडला तसेच अनेक केमिस्ट बांधवांच्या गुणवंत मुलांचे गुणगौरव करण्यात आले तसेच नवनिर्वाचित सदस्यांचे सत्कार करत कार्यकारणीमध्ये निवडी करण्यात आल्या यामध्ये
१)संदीप पारख (आध्यक्ष,)
२)अनिल बेलकर (सचिव)
३)रोहित करपे (खजिनदार)
४)भारत मोकाशी (उपाध्यक्ष बारामती, दौंड ,इंदापूर)
५) रमेश शेवाळे (उपाध्यक्ष JAK)
६)विवेक तापकीर (उपाध्यक्षPCMC)
७) विजय राठी (उपाध्यक्ष पुणे शहर.होलसेल)
८)संजय कुंजीर (उपाध्यक्षपुणे शहर रिटेल)
९) विकास काळे (उपाध्यक्ष पुणे पूर्व)
१०)रोहित जोशी (संघटक सचिव)
११)राहुल देशपांडे (सहसचिव )
१२) रवींद्र ढमाले (सहसचिव)
१३) शशिकांत डांगी( सहसचिव)
१४) गणेश ठोंबरे ( ग्रामीण सं सचिव)
१५)रोहिदास राजपुरे (पीआरओ ग्रामीण)
१६) रामनिक कावेडिया (पीआरओ शहर)
१७)सचिन धोका (पीआरओ PCMC)
या निवडीवेळी संपूर्ण पुणे जिल्ह्यातील केमिस्ट बहुसंख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसन्न पाटील व प्राजक्ता जोगळेकर यांनी केले तर आभार नवनियुक्त अध्यक्ष संदीप पारख यांनी मानले…
कोटासाठी
येणाऱ्या काळात आम्ही संघटनात्मक काम करणार असून पुढील काळात घाऊक व किरकोळ विक्रेत्यांना येणाऱ्या अडचणी संघटनेच्या मार्फत सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत व मला संघटनेत पीआरओ पदी (दौंड )संधी दिल्यामुळे मी सर्वांचा आभारी आहे…
रोहिदास राजपुरे
सीएपीडी सदस्य. दौंड










