प्रकाश केदारे
तालुका प्रतिनिधी पाथरी
गोदावरी खोरे समन्यायाची पाणी वाटपासाठी उच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार जलाशयातील आकडेवारीच्या पुनरावलोकन करून मेंढेगिरी समितीच्या सूत्रानुसार पाणी वाटप करण्यात यावे अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे भाजपा प्रवेश प्रवक्ते डॉ. उमेश देशमुख यांनी केली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे शनिवार दि२९ जुलै रोजी पाथरी शहरात आले होते यावेळी त्यांनी भाजपा प्रदेश प्रवक्ते व कार्यकारणी सदस्य डॉ. उमेश देशमुख यांच्या घरी भेट दिली यावेळी डॉ. उमेश देशमुख यांनी त्यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की कोकणातून वाहून जाण्याच्या पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी वळविण्याचा अभिनंदनीय ठराव राज्य सरकारने घेतला आहे म्हणत मराठवाड्याला समन्यायी पद्धतीने पाणी वाटप करण्यात यावे या मुंबई उच्च न्यायालयाच्या २३ सप्टेंबर २०१६ च्या निर्णयाची अद्याप अमलबजावणी झाली नाही या विषयात महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाने दर पाच वर्षांनी सुधारित आकडेवारी घेऊन पुनरावलोकन प्रतिक्रिया सुरू केली होती. अशी आठवण करून देत, उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही मराठवाड्याला जीवदानी असणाऱ्या जायकवाडी प्रकल्पास केवळ ६५ टक्के पर्यंत पाणी हक्क मिळू शकला आहे असे निदर्शनास आणून दिले आहे. निवेदना त पुढे म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाने २७ जुलै २०२३ रोजी शासन निर्णयाद्वारे गोदावरी खोरे समन्यायी पाणी वाटपासाठी नवीन अभ्यास गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून नवीन अभ्यास गटाने उच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार जलाशयातील आकडेवारीच पुनर्नवलोकन करून मेंढेगिरी समितीच्या सूत्रानुसार वाटप करावे जेणेकरून मराठवाड्यावर अन्याय होणार नाही अशी मागणी केली आहे. मराठवाड्यातील जनतेच्या भावना आपण शासनापर्यंत पोहोचवल्यास आमच्यावर पाणी वाटपामध्ये दुजाभाव होणार नाही असा आमचा विश्वास असल्याचेही म्हटले आहे. यावेळी आ. मेघनाताई बोर्डीकर माजी आ. मोहन फड , प्रदेश उपाध्यक्ष गजानन घुगे, पाथरी विधानसभा निवडणूक प्रमुख डॉ. सुभाष कदम, बाळासाहेब जाधव, सुभाष आंबट, डॉ. राजेंद्र चौधरी, संतोष जोगदंड, शिवाजी मोहाळे, रंगनाथराव सोळंके, डॉ. पंडित दराडे, रामकिशन रोंदळे, कृष्णा गिराम, रघुनाथ गुंजकर, सटवा गायकवाड, मायकल दहे आदींची उपस्थिती होती
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)