मधुकर केदार
तालुका प्रतिनिधी, शेवगाव
शेवगाव:शेवगाव तालुक्यातील आखेगावचे सुपुत्र स्वराज्य सैनिक संस्था व सैनिक फेडरेशन अहमदनगर यांच्या वतीने कारगिल विजय दिनानिमित्त दिल्या जाणाऱ्या सैनिक भूषण पुरस्काराने आखेगाव तालुका शेवगाव येथील रहिवासी माजी सैनिक व यश फाउंडेशन अहमदनगरचे संचालक संजय डोंगरे यांना सन्मानित करण्यात आले. संगमनेर येथे कारगिल विजय दिनाच्या आयोजनात सामाजिक कार्य करणाऱ्या माजी सैनिकांना समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी बीज माता राहीबाई कोपरे यांच्या हस्ते व स्वराज्य सैनिक कल्याण संस्थेचे पदाधिकारी डॉक्टर सर्जेराव नांगरे कॅप्टन तांदळे प्रकाश कोटकर सुभाष कुंडेकर सुनील थोरात प्रवीण गुंजाळ खिल्लारी, कॅप्टन संजय अभंग सुभेदार मेजर मोराळे,खताळ, आदींची प्रमुख उपस्थिती होती श्री डोंगरे यांनी 24 वर्षे आर्मीची सेवा केली उधमपूर कुमाप स्काऊट 862 लाईट रेजिमेंट ऑपरेशन विजय यामध्ये त्यांनी सहभाग नोंदवला. सेवानिवृत्तीनंतर यश फाउंडेशन अहमदनगर या सेवाभावी संस्थेची स्थापना करून त्या माध्यमातून विद्यार्थी खेडेगाव मध्ये ग्रंथालयाचे निर्मिती करून मुलांना वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेची पुस्तके संगणक मोफत मार्गदर्शन वधु वर मेळाव्याच्या माध्यमातून विधवा घटस्फोटीत मुला-मुलींची लावून दिले. पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी वृक्षारोपण चळवळ आदींच्या माध्यमातून डोंगरे ही निस्वार्थी भावनेने समाजसेवेचे कार्य करत आहेत.











