माबुद खान
तालुका प्रतिनिधी जिंतूर
जिंतूर: अमरावती येथील जाहीर सभेत संभाजी भिडे यांनी क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या बद्दल अवमानकारक वक्तव्य केले. तसेच यापूर्वी देखील संभाजी भिडे यांनी महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य केले आहे. त्यामुळे महात्मा फुले प्रेमी व इतर समाजसुधारकांच्या विचारांवर चालणाऱ्या नागरिकांच्या भावना दुखावल्या आहेत.त्यामुळे संभाजी भिडे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने जिंतूर तहसीलदार मार्फत राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनावर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पदाधिकारी महात्मा फुले प्रेमी नागरिकांच्या सह्या आहेत.संभाजी भिडे यांच्यावर तात्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्यास समस्त शिव, शाहू, फुले आंबेडकर प्रेमी नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील या निवेदनात देण्यात आला आहे.