संदीप टूले
तालुका प्रतिनिधी दौंड
महाराष्ट्र राज्यातील सरपंच याच्यासाठी कार्यरत असलेल्या सरपंच सेवा संघाच्या माध्यमातून अनेक गावे आदर्श तयार करण्याचे तसेच सरपंचांना सन्मान मिळवून देऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी केले जात आहे.त्याचा एक भाग म्हणून “मान कर्तृत्वाचा ,सन्मान नेतृत्वाचा”राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार 2023 सरपंच सेवा संघ महाराष्ट्र यांच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार 2023 चे वितरण झाले.रविवार दि. 30 जुलै 2023 रोजी माऊली संकुल सभागृह अहमदनगर येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला.
देलवडी गावच्या सरपंच सौ. निलम नरेंद्र काटे यांना 2023 चा लोकनियुक्त आदर्श सरपंच पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.. सामाजिक,राजकीय क्षेत्रात विशेष कार्यासाठी संघाच्या वतीने पुरस्कार दिले जातात. देलवडी गावच्या सरपंच सौ.निलम काटे यांनी गेली पाच वर्षे आपल्या सरपंच पदाच्या कार्यकाळात राज्यातील अनेक पथदर्शी संकल्पना राबविल्या.गावाला सुरक्षा कवच,संपुर्ण गावाला मास्क,स्कार्प वाटप,गावासाठी स्वतंत्र कोविड सेंटरची उभारणी याची नोंद राज्यभर घेतली गेली.वैयक्तिक लाभाच्या योजना असतील,
गावातील शाळकरी मुलांच्या समस्या असतील,
महिला सबलीकरण,शिक्षक,पालक,विद्यार्थी यांना सोबत घेऊन घेतले विशेष प्रेरणादायी कार्यक्रम, कार्यशाळा,आरोग्य शिबीरे, ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध योजना,यामध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्यबद्दल सौ.निलमताई यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे.आरोग्य,शिक्षण,पर्यावरण यामध्ये त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. या राज्यस्तरीय पुरस्कारमध्ये आदर्श सरपंच,उद्योग भूषण ,समजभूषण , प्रशासकीय सेवा ,महसूल,राजकीय,केला,अशा विविध शेत्रतील मान्यवरांना सन्मानित करण्यात आले.यावेळी भास्करराव पेरे पाटील,पंजाबराव डख,बाबासाहेब पावसे,रोहित पवार,सागर कासार,महेश शिंदे, सुजाता कासार आदी मान्यवरांच्या हस्ते सौ निलम काटे यांना सन्मान पत्र, मानचिन्ह, फेटा व शाल देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी देलवडी येथील संचालक विकास शेलार, अनिल वांझरे ,अर्जुन वाघोले,अयोध्या अडागळे,बाळू जाधव , दत्तात्रय शेलार, प्रकाश जाधव, नरेंद्र काटे राजाभाऊ शेलार,बापूराव शेलार, ग्रा पं. सदस्य,आदी मान्यवर उपस्थित होते.


