गोविंद खरात
शहर प्रतिनिधी, अंबड
आज दि:-३०/०७/२०२३ रोजी तालुक्यात ज्ञानभूमी महात्मा फुले नगर येथे चिंतन शिबिर राबविण्यात आले होते. या प्रमुख मार्गदर्शक जिल्हा सरचिटणीस राजेश सदावर्ते सर, समता सैनिक दलाचे डिव्हिजिनल ऑफिसर तथा बौदाचार्य कुणाल दहिवले गुरुजी, भद्रे गुरुजी, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले SBI-BRANCH MANEGER दीपक खोब्रागडे गुरुजी. पहिल्या सत्रात पूजनीय भन्ते राजतरन आणि दीपक खोब्रागडे यांच्या हस्ते ध्वजारोहणा पासून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
महत्वाचे विषय
१)प्रबोधनाची आचारसंहिता कशी पाळावी?
२)बौद्ध समाजाने काय करावे काय करू नये?,
संस्कार विधीत एकसूत्रता आनणे.हे अमूल्य मार्गदर्शन सदावर्ते गुरुजींनी केले. समता सैनिक दलाचे दहिवले गुरुजी यांनी समता सैनिक दल, सैनिकाचे कर्तव्ये ,या वर सखोल मार्गदर्शन केले.भास्कर साळवे गुरुजी यांनी बाबासाहेबांची धम्म क्रांती या विषयाला अनुसरून आठ गोल्डन मार्ग सांगितले. भद्रे गुरुजी यांनी गावपातळीवर धम्म चळवळ कशी करावी यावर थोडक्यात मार्गदर्शन केले त्याच बरोबर प्रमुख पाहुणे दीपक खोब्रागडे गुरुजी यांनी चिंतन का घ्यावा लागतो?,चिंतन टेम्पोररी करायचे नसते. शिक्षण, संस्कार,येणाऱ्या पिढीचे भविष्य ,शिस्तबद्धता, दूरदृष्टी,प्रज्ञावाण मानव-यावर अमूल्य असे मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात तालुका महिला कार्यकारणी निवड
१)महिला उपाध्यक्ष – संगीता कृष्णा येडके.
२)सचिव – गीता येटाळे.
३)संरक्षण विभाग – मंगल अनिल खरात.
४)कोषाध्यक्ष – सविता रमेश वाघमारे.
५)सहसचिव – चंद्रकला खंडागळे
६)संघटक – वंदना बाबासाहेब पवार
७)सदस्य – मालन थोरात, लता रुपवते. यासर्वांची जिल्हा कार्यकारणीच्या वतीने निवड करण्यात आली.पूज्यनिय भन्ते राजरत्न यांनी थोडक्यात धम्म देसनेत आपण प्रामाणिक प्रमाणे धम्माशी एकरूप असावे. प्रत्यकाने आपापल्यापरीने काहीतरी केलं पाहिजे, असे सांगितले. तालुका अध्यक्ष शिवाजी गाडेकर यांच्या अध्यकक्षीय भाषणाने समारोप करण्यात आला. प्रमुख उपस्थिती डॉ.राहुल बागुल, राहुल साळवे गुरुजी, बोधाचार्य भीमराव बनसोडे गुरुजी,वाहुलकर दादा.
सरचिटणीस बि.डी पवार गुरुजी, सैनिक संजय वनकर खरात, दिनेश सातपुते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु.केंद्रीय शिक्षिका तथा जिल्हा महिला सचिव-ज्योती सुनील खरात,कार्यक्रमाच्या शेवटी संगीत येडके-1 फॅन मंगल अनिल खरात-1 गॅस सिलेंडर शेगडी रमाई प्रतिष्ठान-10 खुडच्या आणि पुस्तकांसाठी 2 रॅक वाचनालया साठी धम्मदान.