राजेंद्र पोटफोडे
ग्रामीण प्रतिनिधी,अमरापूर
अमरापूर:आज दि.31 रोजी शेवगाव तालुक्यातील अमरापूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. दी फ्रेंड्स ऑफ डिप्रेसड लीग या शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कर्मयोगी जगन्नाथ कान्होजी उर्फ आबासाहेब काकडे यांच्या 104 व्या जयंती माह निमित्त विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यालयांमध्ये विविध स्पर्धांचे गेल्या महिनाभरापासून आयोजन करण्यात आले होते. व आज त्याचा बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात कर्मयोगी आबासाहेब काकडे स्व. निर्मलाताई काकडे व विद्येची देवता सरस्वती यांच्या प्रतिमा पूजनाने झाली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर आवारे यांनी तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अध्यक्षीय सूचना अशोक जाधव यांनी मांडली व त्यास श्रीम मंगल वावरे यांनी अनुमोदन दिले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमरापुर ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच गणेशजी बोरुडे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते राजू नाना पोटफोडे हे लाभले होते. विद्यालयाचे प्राचार्य गणपत शेलार यांनी गणेशजी बोरुडे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला तसेच संस्थेचे संस्था प्रतिनिधी शशिकांत काकडे सर यांनी राजू नाना पोटफोडे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विद्यालयामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, रंगभरण स्पर्धा, कुस्ती स्पर्धा, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा,तसेच कथाकथन, संस्कार शिबिर, किशोरवयीन मुलींसाठी मार्गदर्शन शिबिर, वृक्षारोपण आदी कार्यक्रम घेण्यात आले.आज पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना विद्यालयाचे प्राचार्य श्री. गणपत शेलार कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.गणेशजी बोरुडे तसेच सामाजिक कार्यकर्ते राजू नाना पोटफोडे या मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष गणेशजी बोरुडे यांनी विद्यार्थ्यांना आबासाहेबांचे विचार तसेच विद्यार्थ्यांच्या शिक्षणाप्रती असलेली त्यांची तळमळ याविषयी आपले मत व्यक्त केले.तसेच विद्यालयाचे प्राचार्य शेलार सर यांनी आबासाहेबांचे कुस्ती या खेळाविषयी असलेले प्रेम या विषयी माहिती दिली.शशिकांत काकडे यांनी आभार मानले.आजच्या कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


