रमेश शिंगोटे
तालुका प्रतिनिधी, संगमनेर
संगमनेर : पर्यावरण संवर्धन हे अत्यंत महत्त्वाचे असून यासाठी सहकार महर्षी स्व. भाऊसाहेब थोरात यांनी १६ वर्षापूर्वी सुरू केलेल्या या दंडकारण्य अभियानाचे माध्यमातून संगमनेर तालुक्यात वृक्ष संवर्धन संस्कृती वाढवली आहे.वृक्ष संवर्धन हीच परंपरा जोपासत संपूर्ण तालुका हा हिरव्या वनराईचा तालुका निर्माण करण्यासाठी प्रयत्न असून लाखो वृक्षांचे रोपण व संवर्धनासाठीची ही मोठी लोक चळवळ ठरली.. याचे औचित्य साधून आज परम पूज्य पावन भूमी श्री यमनागिरी बाबा मठ सुकेवाडी येथे संगमनेर तालुका दशनाम गोसावी समाज संघटनेच्या वतीने दंडकारण्य अभियान वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी सुकेवाडी ग्रामपंचायत सरपंच सौ संगीता सातपुते, उपसरपंच श्री. सुभाषराव कुटे, पोलीस पाटील श्री. किशोर शेटे, गोरख सातपुते, संघटनेचे मार्गदर्शक बाबासाहेब गोसावी, किशोर गोसावी, संगमनेर तालुका दशनाम गोसावी समाज संघटनेचे मुख्य प्रवर्तक श्री भागवत भारती, अध्यक्ष श्री .दशरथ गोसावी, सचिव सोमनाथ गोसावी सर, कार्याध्यक्ष श्री. चंदन गोसावी, संघटक श्री .प्रदीप गोसावी उपाध्यक्ष. श्री संतोष पुरी, रंजीत गिरी, सहसचिव प्रवीण गोसावी, सल्लागार श्री. लक्ष्मण भारती, रवींद्र गिरी, श्री .काशिनाथ गोसावी, ओंकार गोसावी, अण्णासाहेब गिरी, (वनविभाग) सुभाष गोसावी, लालू गोसावी, भाऊसाहेब गोसावी ,रमेश गोसावी आदी समाज बांधवांच्या उपस्थितीत वृक्षारोपण मोहीम करण्यात आली.यावेळी महाराष्ट्र राज्य वनीकरण विभागाच्या वतीने विविध प्रकारचे रोपे उपलब्ध करून देण्यात आली.संगमनेर तालुका दशनाम गोसावी समाज संघटनेचे सर्व पदाधिकारी यांनी व बहुमोल असे वृक्षारोपणासाठी सहकार्य आणि परिश्रम घेतले.