सुधीर जाधव
जिल्हा प्रतिनिधी, सातारा
सातारा : दि. 30, खिंडवाडी येथे दर रविवारी जनावरांचा आठवडे बाजार सुरू. सातारा बाजार समितीच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष बंद झालेला जनावरांचा बाजार नव्याने सुरू करण्यात आला आहे.
यामुळे शेतकऱ्यांचा आणि पशुपालक शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. बाजार समितीच्या नवीन जागेत विकासरत्न अभयसिंहराजे भोसले उपबाजार उभारणीचे काम सुरू झाले, असून या ठिकाणी सर्व प्रकारच्या सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. सातारा बाजार समितीच्या माध्यमातून व्यापार वृद्धी होणार असून, शेतकरी हित जोपासण्याला प्राधान्य दिले जाईल. कायदेशीर लढाई जिंकून बाजार समितीने खिंडवाडी येथील जागा मिळवली, असून या ठिकाणी जागेच्या अभावी गेल्या अनेक वर्षापासून जनावरे बाजार बंद होता. आता बाजार समितीकडे पुरेशी जागा उपलब्ध झाली असून, शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि सोयीसाठी या ठिकाणी दर रविवारी जनावरांचा बाजार भरविण्याचा निर्णय घेण्यात आला. जनावरांचा व्यापार करणाऱ्या लोकांच्याकडून अनेकदा शेतकऱ्याची फसवणूक होत असते, शेतकऱ्यांना उच्च प्रतीची जातिवंत जनावरे स्वतः पाहून पसंत करून योग्य किमतीत खरेदी करता यावीत, तसेच इच्छुक शेतकऱ्यांना आपली जनावरे योग्य किमतीत विक्री करता यावेत, यासाठी बाजार समितीच्या खिंडवाडी येथील विकासरत्न अभयसिंहराजे भोसले उपबाजार येथे आठवडा जनावरे बाजार सुरू करण्यात आला आहे. लवकरच या ठिकाणी जनावरांचा दवाखाना सुरू करणार असल्याचे आ. फशिवेंद्रसिंहराजे यांनी जाहीर केले.तसेच लवकरच सुसज्ज आणि अध्यायावत मार्केट यार्ड उभारून व्यापारी आणि शेतकऱ्यांची गैरसोय दूर केली जाणार असल्याचे ते म्हणाले आ. शिवेंद्रसिंहराजें च्या प्रमुख उपस्थितीत जनावरांच्या बाजाराचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी बाजार समितीचे सभापती विक्रम पवार, उपसभापती मधुकर पवार यांच्यासह सर्व संचालक विविध मान्यवर आणि पशुपालन शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


