कैलास खोट्टे
तालुका प्रतिनिधी संग्रामपूर
आज सोनाळा येथे जिप.कन्या शाळा मध्ये मा. श्री.संजय जी कुटे यांनी अतिवृष्टीमुळे बाधित नागरिकांसाठी आयोजित केलेल्या आरोग्य तपासणी शिबिरात आज सोनाळा येथे 1100 नागरिकांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आले.या सोबत हर्षल खंडेलवाल सोनाळा ग्राम. सरपंच सर्व सदस्य यांनी सहकार्य केले.जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांच्या पथकाने आज सोनाळाच नव्हे तर जळगाव जामोद मतदारसंघातही उत्कृष्ट सेवा देऊन सर्व नागरिकांच्या आरोग्याची तपासणी केली. अखेर जिल्ह्याचे वैद्यकीय अधिकारी म्हणून मा. डॉ.गीते साहेब यांनी सोनाळा प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन कार्यक्रमाची सांगता केली.











