रवी झिंजाडे
तालुका प्रतिनिधी करमाळा
करमाळा तालुक्यातील पोथरे गावातील दारु हटवा गाव वाचवा या अभियानाची सुरुवात केली आहे. आभियानाची सुरुवातीची बैठक शनिमंदिराच्या मठात संपन्न झाली, या वेळी अनेक तरुण तसेच समाज सेवक उपस्थित होते. दारुमुळे गावातील अनेक लोकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. त्यामुळे गावातील युवक व महिला एकत्र येऊन दारू हटवा गाव वाचवा हे अभियान राबविण्यात येणार आहे या आभियानाचे निवेदन देण्यासाठी सर्व नागरिकांनी उपस्थित राहायचे आहे व आपल्या घरातील महिलांना उपस्थित करायचे आहे असे या आजच्या प्रथम बैठकीत ठरलेआहे. यानंतर निवेदन व पुढील दिशा, ग्रुप च्या माध्यमातून चर्चा करुनठरवाचे हे या बैठकित सांगितले आहे.या अभियानाची सुरुवातीच्या बैठकीत चांगल्या प्रकारे लोकांनी प्रतिसाद दिला .











