अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
पातूर : शिर्ला परिसरात घडलेली 27 जुलै 2023 पासून बेपत्ता असलेल्या तरुणीचा हातपाय बांधलेल्या अवस्थेत मृतदेह शिर्ला भागात आढळला. ही तरुणी दोन दिवसापासून बेपत्ता होती.ती शौचास जाते असे आईला सांगून गेली ; मात्र घरी परतली नाही त्यामुळे तिच्या घरच्यांनी पातूर पोलिसांना माहिती दिली होती. तीचा शोध घेत असतांना अखेर अंधारे कृषी विद्यालयाच्या परिसराला लागून निमकंडे यांच्या शेताजवळ काटेरी घनदाट झुडपात तरुणीचा ओढणीने हात बांधलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने सर्वत्र खळबळ उडाली.अधिक तपासासाठी डॉग पथक, गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी, उपविभागीय अधिकाऱ्यांनी घटनस्थळाला भेट दिली.खदान परिसरात रेवा डॉग ने आरोपीच्या घरात प्रवेश करून संशयास्पद वस्तू पॅन्ट व चप्पल पोलिसांनी ताब्यात घेतली. आरोपी गजानन बळकार याला ताब्यात घेतले.या घटनेत घातपाताची शक्यता वर्तवण्यात येत आहे.घटना कसून तपासून पाहिली जात आहे.आरोपीच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र तरुणीचा खून कशासाठी करण्यात आला, याची चौकशी वरिष्ठ पोलिस अधिकारी ताब्यात घेतलेल्या आरोपीकडून करीत आहेत.अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.पातूर तालुक्यातील शिर्ला येथील सुमित्राबाई अंधारे कृषी विद्यालयाजवळील क्रीडांगणाला लागून खदान शेत – शिवारात जाणाऱ्या पांदन रस्त्याला लागून घनदाट काटेरी झुडपात एक बेवारस स्थितीत मृतदेह गावकऱ्यांना दिसला.ओढणीने हातपाय बांधलेल्या स्थितीत मृतदेह दिसून आल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली.पोलिस घटनास्थळी पोहोचले.19 वर्षीय मुलीचा मृतदेह असल्याचे निदर्शनास आले.तरुणीच्या नातेवाईकांनी मृतदेहाची ओळख पटवली असून मृतदेह किरण अर्जुन बळकार वय 19 वर्ष हिचा असल्याचे निष्पन्न झाले.पातूर पोलीस स्टेशन चे ठाणेदार किशोर शेळके यांनी याबाबत वरिष्ठांना माहिती दिली आणि तपास सुरू केला आहे.