प्रकाश केदारे
तालुका प्रतिनिधी पाथरी.
काल दि. 29 जुलै रोजी पाथरी येथे विश्वव्यापी ब्राह्मण एकता महासंघ व नरेंद्र मोदी विचार मंच तालुका पाथरी तसेच भारतीय जनता पार्टी अध्यात्मिक आघाडी पाथरी संयुक्त विद्यमाने पाथरी शहरातील सर्व समाजातील ई. दहावी,बारावी व पदवीधर सर्व विशेष मार्क घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्याचे ठरले आहे.या सत्कारात विश्वव्यापी ब्राह्मण एकता महासंघ पाथरी ,भारतीय जनता पार्टी अध्यात्मिक आघाडी पाथरी,नरेंद्र मोदी विचार मंच पाथरी,पंचमुखी हनुमान मंदिर सेवाभावी संस्था पाथरी,या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने प्रत्येकाला सन्मानपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.सन्मान दि.६ ऑगस्ट रोजी कार्यक्रम घेण्याचे ठरले आहे,या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विशेष कोणालाही आमंत्रण दिल्या जाणार नाही कार्यक्रमा वेळी ज्या कोणी व्यक्ती प्रत्यक्ष समोर येतील अशा व्यक्तींच्याच हाताने सदरील मुलांचा सत्कार करण्यात येईल असे या बैठकीत ठरले आहे.या सत्कार समारंभ सोहळ्यास पाथरीतील सर्व समाजातील व विशेष ब्राह्मण समाजातील सर्व समाज बांधवांच्या वतीने हा कार्यक्रम संपन्न होणार आहे,यावेळी एक बैठक घेण्यात आली या बैठकीस माजी सैनिक तुळजा दास लोखंडे,गणेश गाजरे,मनोज केदारे,प्रो. प्रशांत पोखारे नितीन पाटील विजय गाजरे मकरंद ,पाठक बाळू जोशी,प्रवीण बाबळगावकर,नंदकुमार केदारे व विश्वव्यापी ब्राह्मण एकता महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश केदारे उपस्थित होते, सर्वानुमते सर्व समाजातील मुला मुलींचा सत्कार करण्याचे ठरले आहे