मनोज भगत
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे विरोधी पक्षनेते तथा माजी शिक्षण सभापती पुंडलिकराव अरबट यांनी हिवरखेड येथील सहकार तसेच शासकीय निमशासकीय विविध कार्यालयास भेटी देऊन शेतकरी पिकविमा नियोजित हिवरखेड नगरपरिषद हिवरखेड उपबाजारपेठ परिसरात नियोजित मंजुर असलेले १ कोटी रुपयाचे व्यापारी संकुल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेत सुरु असलेले हिवरखेड येथील महसूल विभागाचे तलाठी कार्यालय मनरेगा अंतर्गत शेतकरी पुत्रांना रोजगार मिळावा अश्या विविध विषयास अनुसरून आढावा घेण्यात आला. यावेळी हिवरखेड येथील संवाद शेतकरी गटातर्फे कॉटन मार्केट हिवरखेड परिसरात लवकरात लवकर शेतकरी व्यापारी संकुल बांधकाम सुरु करण्याची मागणी करण्यात आली. याप्रसंगी आम्ही हिवरखेडकर’ परिवारातर्फे नवनिर्वाचित कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पुंडलिकराव अरबट व खरेदी विक्री सहकारी संस्था संचालक नितीन वानखडे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केमिस्ट अँड ड्रगीस्ट संघाचे अध्यक्ष सुनील बजाज होते. प्रमुख उपस्थितीत कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक श्यामशील भोपळे केंद्रप्रमुख मनीष गिऱ्हे महात्मा फुले शिक्षण संस्थेचे सहकार्यवाह स्नेहल भोपळे हे होते. याप्रसंगी सहदेवराव भोपळे विद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.संतोषकुमार राऊत रामकृष्ण भड रंजित राठोड अभिजित भोपळे, गजानन पवार प्रशांत भोपळे,श्रीकांत परनाटे गणेश भोपळे अमोल येऊल यांची तसेच पुंडलिकराव अरबट यांच्या विविध स्थळी भेट दरम्यान शेतकरीमंडळी व विविध विभागाचे संबंधित बहुसंख्येने उपस्थित होते.