संजय भोसले
तालूका प्रतिनिधी,कणकवली
कणकवली : देशात ज्या ज्या वेळी महिलांवर अन्याय झाला त्या त्या वेळी सर्व समाज एक होत राहिला. मणिपूर येथे झालेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा. सरकारने संवेदनशील राहिले पाहिजे. मात्र तसे होताना दिसत नाही .याउलट सभागृहात महिला केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी मांडलेली बाजू पाहता त्यांना महिला म्हणून घ्यायला लाज वाटली पाहिजे होती.देशात असंवेदनशील सरकार येता कामा नये याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. मोदींनी जनतेची माफी मागावी, मणिपूरमध्ये महिलांवर झालेल्या अत्याचाराचा जेवढा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. असे प्रतीपादन सामाजिक कार्यकर्त्या कमलाताई परुळेकर यांनी कणकवली येथे पटवर्धन चौकात जाहीर सभेत केले. अमन के साथी सिंधुदुर्ग या संस्थेच्या वतीने कणकवली येथील पटवर्धन चौकामध्ये जाहीर सभेत मणिपूर येथे महिलांवर घडलेल्या अत्याचाराच्या जाहीर निषेध करण्यात आला यावेळी संविधान जिंदाबाद यासह जोरदार घोषणाबाजी उपस्थितानी केल्या. तसेच महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा निषेधही अनेक वक्त्यांनी यावेळी केला .या सभेला सामाजिक कार्यकर्त्या कमलाताई परुळेकर यांच्यासह नितीन वाळके, बाळू मिस्त्री, प्रशांत वनस्कर, सतीश लळीत, सई लळीत, अशोक करंबेळकर, सादिक कुडाळकर, संदीप तांबे, तनवी शिरगावकर, शितल मांजरेकर ,वंचित चे जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर ,रोहन कदम ,दादा कुडतरकर, संदीप कदम, शितल मांजरेकर ,अभिनेते निलेश पवार ,रुपेश नार्वेकर, संतोष पुजारी ,महेश कोदे, महानंद चव्हाण ,रुपेश खाडे, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर ,श्रद्धा कदम, सुजित कांबळे, संजना सदडेकर ,रश्मी तेंडुलकर, डॉक्टर नितीन शेटे, चंद्रकांत चव्हाण ,काँग्रेस जिल्हाध्यक्ष इरशाद शेख ,सिद्धी वरवडेकर ,उमेश वाळके ,सरिता पवार ,अनुप वारंग ,अनिल हळदीने ,रंजन चिकी, ज्येष्ठ अभिनेता नंदकुमार पाटील, विनोद सिंह पाटील .यांच्यासह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते या सभेत अनेक मान्यवरांनी मणिपूरच्या घडलेल्या घटनेचा आणि एकंदरीतच देशभर महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा जाहीर निषेध व्यक्त केला.