संतोष अटकर
ग्रामीण प्रतिनिधी, उगवा
उगवा : अकोला जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी जिल्ह्यातील पूरपरिस्थिती नुकसानग्रस्त भागांना भेटी देऊन पाहणी केली. जिल्ह्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाली. त्यामुळे नद्यानाल्यांना आलेल्या पुरामुळे लाखो हेक्टर शेतीचे नुकसान झाले. कमीअधिक प्रमाणात जिल्ह्यात सर्वत्र मोठे नुकसान झाले. घरात पुराचे पाणी शिरल्याने पडझड झालेली घरे, खरडून निघालेल्या शेत जमिनी, शासकीय मालमत्तेच्या नुकसानाचा स्वतः बांधावर हजर राहून पाहणी केले.तालुक्यातील आगर सर्कल, उगवा सर्कल खेकडी नवथळ मधील गावातील शेतकर्यांच्या बांधावर जिल्हाधिकारी पोहोचले. तेथील नुकसान झालेली शेती, पूलांची पाहणी करून तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश त्यांनी सोबत असलेल्या अधिकार्यांना दिले. त्यानंतर खांबोरा येथील गावचा संपर्क तुटल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात ये जा करिता त्रास सहन करावा लागत आहे.तेथील नदिवरील पुलाला त्यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी अजित कुभार, जिल्हा परिषद आयुक्त बी.वैष्णवी मॅडम तहसीलदार, सुनील पाटील,तलाठी रश्मी पठाण कृषी सहाय्यक रेणुका टाके सरपंच राहुल तेलगोटे, कृषी मित्र किरण पांडे, पद्माकर मोरे समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते.


