कैलास खोट्टे
तालुका प्रतिनिधी संग्रामपूर
22 जुलै रोजी झालेल्या पावसामुळे सर्वत्र अतोनात नुकसान झाले असून ठीक ठिकाणी घरे,दुकाने,शेतीचे नुकसान झाले आहे.आणि सर्व होत्याचे नव्हते झाले.खूप जण बेघर झाले.याची पाहणी करण्यासाठी स्वतः मा.जिल्हाधिकारी डॉ.तुम्मोड सोनाळा येथे आले व सर्वाची विचारपूस करून स्वतः पाहणी केली.सोबत युवा सरपंच हर्षल खंडेलवाल तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य हजर होते.तात्काळ पंचनामे करून सर्वांना याचा मोबदला मिळेल हीच अपेक्षा











