कैलास श्रावणे
तालुका प्रतिनिधी पुसद
पुसद कार्यक्षेत्र असलेल्या पुसद अर्बन बँकेची २०२३ ते २०२८या पाच वर्षासाठी संचालक मंडळाची अविरोध निवड झाली होती. त्यानंतर आज २४जुलै रोजी झालेल्या विशेष सभेत शरद मैंद यांची बँकेच्या अध्यक्षपदी सलग पाचव्यांदा अविरोध निवड झाली.नागरी सहकारी बँकेच्या अध्यक्ष पदी विक्रमी सलग पाचवी वेळ अविरोध निवडून येण्याचा अवघ्या महाराष्ट्रातील ही दुर्मिळ निवड म्हणावी लागेल .बँकेच्या उपाध्यक्ष पदी राकेश खुराणा (वणी )यांची देखील अविरोध निवड झाली.पुसद अर्बन बँकेत आज दुपारी 1वाजता जिल्हा उपनिबंधक व अध्यासी अधिकारी नानासाहेब चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीची सभा संपन्न झाली.यावेळी सहायक निबंधक सुनील भालेराव पुसद, सहाय्यक निबंधक सचिन कुडमेथे वणी, सहकार अधिकारी अनिल सुरपाम पुसद, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक सेवकर पुसद अर्बन बँक आदी उपस्थित होते.२१वर्ष्यापुर्वी म्हणजेच २००२ साली झालेल्या बँकेच्या ऐतिहासिक निवडणुकीनंतर शरद मैंद यांच्या खांद्यावर सर्वप्रथम १५ जुलै २००२साली बँकेच्या अध्यक्षपदाची धुरा आली
त्यावेळी बँकेपुढे एन.पी.ए. सह अन्य समस्या उभ्या ठाकल्या होत्या. शरद मैंद यांनी त्यांचे वडील बँकेचे माजी अध्यक्ष एड.आप्पाराव मैंद यांच्या कणखर नेतृत्व व मार्गदर्शनाखाली तसेच संचालक मंडळाच्या सहकार्याने सुरवातीचे ५वर्ष एन.पी. ए.च्या संकटावर मात करून बँकेची आर्थिक व गुणात्मक प्रगती साधली.त्याच काळात तलाव ले आउट मध्ये बँकेची टुमदार प्रशासकीय इमारत उभारून तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे हस्ते तिचे लोकार्पण झाले.२००८ मध्ये बँकेला संपूर्ण महाराष्ट्र कार्यक्षेत्र मिळाल्यानंतर मागील 15वर्षात बँकेचा कार्यविस्तार मुख्यकार्यालयासह ३८ शाखांपर्यंत फोफावला.याच दरम्यान बँकेच्या ठेवीमध्ये मोठी वाढ झाली. तसेच नेट एनपीए देखील सातत्याने मर्यादेत राखण्यात यश आले. तसेच बँकिंग क्षेत्रात वेळोवेळी येणाऱ्या सर्व आधुनिक सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या आहे. बँकेने शरद मैंद यांच्या संकल्पनेतून अनेक सामाजिक कार्यात देखील मोठे योगदान दिले. त्यामध्ये प.पु.रामेश्वरम महाराज यांचे प्राणायाम ,योग व आयुर्वेदिक औषध शिबीराच्या दोन वेळा केलेल्या आयोजनाचा हजारो नागरिकांना लाभ झाला.पुसद व लगतच्या श्रीरामपूर येथील १८५०व्यापाऱ्यांना डस्ट बिन (कचरा पेटी) वाटप, तालुक्यातील ६४कुपोषित बालकांना ६महिन्यापर्यंत तपासणी,औषध व पोषण आहार देऊन कुपोषणाबाहेर काढले.२०१६मध्ये भीषण पाणी टंचाई असतांना पुसद शहरात सलग २महिने १लाख लिटर पाणी वाटप , नागरिकांना रेन वॉटर हार्वेस्टिंग साठी प्रोत्सहान व कार्यशाळा आयोजन केले त्यामुळे सुमारे १हजार शोष खड्डे निर्माण झाले., शासनाच्या वृक्ष लागवड आवाहनाला प्रतिसाद देत ३००झाड लावून त्यांचे जतन केले.कुष्ठ रोग, पोलिओ निर्मूलन सारखे राष्ट्रीय कार्यक्रम तसेच आगग्रस्त नागरिकांना, पूर, कोरोना सारख्या नैसर्गिक व राष्ट्रीय आपत्ती वेळी बँकेने वेळोवेळी पुढाकार घेवून मदत दिली. याच दरम्यान भव्य बिजनेस एक्स्पो च्या माध्यमातून बाजारपेठेला चालना देण्यात आली. तसेच पुसद शहराच्या वर्दळी च्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्वसोयीयुक्त पोलीस चौकी, देशभक्त शंकरराव सरनाईक वाचनालयात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विदयार्थ्यांसाठी सुसज्ज अभ्यासिका उभारण्यात आली. पुसद अर्बनच्या बँकिंग व सामाजिक कार्याची दखल घेतल्या जाऊन बँकेला पदमभूषण वसंतदादा पाटील पुरस्कार ६वेळा, फेडरेशन चा महाराष्ट्रातून प्रथम २वेळा, अध्यक्ष शरद मैंद यांना उदयोन्मुख सहकार कार्यकर्ता पुरस्कार,सामाजिक उपक्रमाचा विदर्भातून प्रथम क्रमांकाचे २,माहिती तंत्रज्ञानाचा महाराष्ट्रातून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार , तसेच विदर्भ असोशियेशन चे ३ अश्या पुरस्कारांनी गौरविल्या गेले. आयएसओ प्रमाणपत्र प्राप्त व विदर्भ मराठवाड्यात मोबाईल बँकिंगसाठी परवानगी मिळविणारी पुसद अर्बन पहिली बँक आहे.बँकेच्या संचालक मंडळाची देखील सलग तिसऱ्यांदा अविरोध निवड म्हणजे सभासदांचा बँकेच्या नेतृत्वावरील विश्वासच असल्याच्या प्रतिक्रिया मिळत आहेत.अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीवेळी संचालक के.आय.मिर्झा,ललित सेता,नीळकंठ पाटील, बाळासाहेब पाटील (कामारकर),विनायक डुब्बेवार,प्रवीर व्यवहारे,गोपाल अग्रवाल, निरंजन मानकर सौ.राजश्री सुधीर देशमुख,सौ. वंदना शरद पाटील, अतुल पावडे, सुनिल चव्हाण,रंजीत सांबरे उपस्थीत होते.