कलीम शेख
तालुका प्रतिनिधी, संग्रामपूर
संग्रामपूर : अतिवृष्टी मुळे संग्रामपूर, जळगाव जामोद, नांदुरा, शेगाव, मलकापूर तालुक्यात २२ जूलैला सकाळी १०.३० पासून पावसाने थैमान घातले आहे. जीवनावश्यक वस्तूंची अत्यावशकता सदर परिसरातील नागरिकांना सद्यस्थितीत आहे. मुळापासून बरेच घरे, शेती साहीत्य,गूरे ढोरे,वाहने तर एकलारा येथील शेतकरी धूर्डे पुरात वाहून गेले आहे. असंख्य संसार उद्धवस्त झाले आहे.शेकडो हेक्टर शेती खरडून गेली. तर वर्तमान परिस्थितीत निवारा, उपासमारी आणि संसर्गजन्य आजारापासून संरक्षणाची गरज आहे. मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांनी अतिवृष्टी भागाची पाहणी करण्यासाठी प्रत्यक्ष यावे.तेव्हाच खऱ्या अर्थाने वास्तविकता सरकाच्या निदर्शनास येईल. असे आवाहन आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. सतीशचंद्र रोठे यांनी आजच्या पाहनी दौ-या दरम्यान केले आहे.आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या वतीने जळगाव जामोद, संग्रामपूर तालुक्यातील अतिवृष्टी भागाची प्राथमिक पाहणी करण्यात आली.आज पळशी सुपो, सूलज, धानोरा महासिद्ध,हनवतखेड, चाळीसटापरी, भिंगारा, सुनगाव,जळगाव जामोद, दुर्गदैत्य, वानखेड गावांना भेटी देत प्रत्यक्ष पाहणी केली.बहुतांश गावात पंचनामे झालेले नसून संबंधितांना माहिती देत पंचनामे यावेळी करून घेतले.
तर परिसरातील पाहणी करून जळगाव जामोद एसडीओ कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांची भेट घेऊन सविस्तर वास्तविक माहिती त्यांनी देत उपाय योजना करण्याची विनंती केली.अतिवृष्टी पूरग्रस्त दौऱ्यामध्ये आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड सतीशचंद्र रोठे, विदर्भ प्रदेशाध्यक्ष शेख शहीद महिला जिल्हाध्यक्ष वर्षाताई ताथरकर, संग्रामपुर तालुका अध्यक्ष शेख कलीम, जळगाव जामोद तालुका अध्यक्ष रसूल भाई, जिल्हा अध्यक्ष अरबाज खान साबीर शेख यासह बहूसंख्य पदाधिकारी सहभागी झाले होते.