विश्वास काळे
ग्रामीण प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड :यवतमाळ जिल्ह्याचे सहकारी संस्थाचे जिल्हा उपनिबंधक मा. नानासाहेब चव्हाण यांनी दि.24 जुलै रोजी संत सावता माळी नागरी सहकारी पतसंस्थेच्या पुसद मुख्य शाखेस सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी पतसंस्थेचे संस्थापक,अध्यक्ष आत्माराम जाधव यांनी त्यांचा शाल व बुके देऊन सत्कार केला.तसेच पुसदचे सहाय्यक निबंधक सुनील भालेराव,वणी चे सहाय्यक निबंधक मा.सचिन कुडमेथे व पुसद निबंधक कार्यालयाचे सहकार अधिकारी ए.के. सुरपाम यांचाही अध्यक्ष आत्माराम जाधव यांनी पतसंस्थेच्या वतीने सन्मान केला.जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण हे पुसद विभाग दौऱ्यावर आले असता त्यांनी संत सावता माळी पतसंस्थेस भेट देऊन पतसंस्थेच्या कामकाजाची माहिती घेतली.पतसंस्थेच्या प्रगतीचा आढावा घेऊन पतसंस्थेने जिल्ह्यात लघु उद्योगासाठी केलेल्या कर्ज वाटपाबाबत आनंद व्यक्त केला.भविष्यात जिल्ह्यात लहान – मोठे उद्योग वाढीसाठी पतसंस्थेने सुरक्षित कर्ज वाटप करावे तसेच पंतप्रधान विमा योजना, कर्ज वसुली इत्यादी बाबत मार्गदर्शन केले.संत सावता माळी पतसंस्थेच्या प्रगतीबाबत त्यांनी समाधान व्यक्त करून सर्व सहकार्याचे आश्वासन दिले.याप्रसंगी सहाय्यक निबंधक सुनील भालेराव,सचिन कुडमेथे साहेब यांनीही मार्गदर्शन केले.याप्रसंगी पतसंस्थेचे व्यवस्थापक शिवाजी सारंगे,लिपीक सौ.प्रिती साबळे,कु.रिंकू वाघमारे,सेवक संदीप मगर इ. उपस्थित होते.











